आम्हाला खामेनींना संपवायचे होते, पण संधी मिळाली नाही – इस्रायली संरक्षण मंत्री

आम्हाला खामेनींना संपवायचे होते, पण संधी मिळाली नाही – इस्रायली संरक्षण मंत्री

इस्त्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी एका धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले आहेत की, “इस्त्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार मारण्याची योजना आखली होती. मात्र योग्य संधी न मिळाल्याने ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही.” ही मुलाखत इस्त्रायलच्या चॅनल 13 या वृत्तवाहिनीवर प्रसारित झाली.

काट्झ यांनी सांगितले की, “जर खामेनी आमच्या टप्प्यात असते, तर आम्ही त्यांना ठार मारले असते. आम्ही त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते भूमिगत झाले आणि त्यांनी आपल्या कमांडर्सशी संपर्क तोडला, त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात आणणे शक्य झाले नाही.” त्यांनी पुढे असेही नमूद केले की, खामेनी यांना आपल्या जीवाला धोका आहे, याची जाणीव होती, त्यामुळे ते लपले होते.

इस्रायल आणि इराणमधील अलिकडच्या युद्धानंतर हे विधान आले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या युद्धबंदीनंतर इराणने कतारच्या अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला करून अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर हा संघर्ष संपला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;