यात्रेकरूंची पहिली तुकडी कैलास मानसरोवरला पोचली

यात्रेकरूंची पहिली तुकडी कैलास मानसरोवरला पोचली

तब्बल पाच वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. 36 यात्रेकरूंची पहिली तुकडी तिबेट मार्गे पवित्र स्थळी पोचली. हिंदुस्थानातील चीनचे राजदूत शू फेइहोंग यांनी एक्सवर पोस्ट लिहिली की, आम्हाला आनंद वाटतोय की यात्रेकरूंची पहिली तुकडी तिबेटमधून मानसरोवर येथे पोचली. कैलास मानसरोवर यात्रेसाठी 36 यात्रेकरूंचा जथा महत्त्वपूर्ण आहे. कारण पाच वर्षांच्या खंडानंतर या पवित्र ठिकाणी येणाऱया यात्रेकरूंचा हा पहिला समूह आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी 15 तुकडय़ा रवाना होणार आहेत. प्रत्येक बॅचमध्ये 50 यात्रेकरू असतील. पाच गट उत्तराखंड राज्यातील लिपुलेख दर्रे पार करून आणि 10 गट सिक्कीम येथून नाथुला दर्रे पार करून प्रवास करेल. जून ते ऑगस्ट दरम्यान यात्रा पार पडेल. कैलास मानसरोवर यात्रा पवित्र आणि कठीण यात्रांपैकी एक आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले हिंदुस्थानी नागरिक ही यात्रा करू शकतात. वयाची कमाल मर्यादा 70 आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;