कल्याणच्या साई इंग्लिश स्कूलची मोगलाई भरमसाट फी, डोनेशन, शिक्षकांचे लज्जास्पद वर्तन; मनमानीविरोधात शिवसैनिकांचे आंदोलन

कल्याणच्या साई इंग्लिश स्कूलची मोगलाई भरमसाट फी, डोनेशन, शिक्षकांचे लज्जास्पद वर्तन; मनमानीविरोधात शिवसैनिकांचे आंदोलन

कल्याण पूर्व येथील साई इंग्लिश स्कूल शाळेमध्ये गैरप्रकार व बेशिस्त कारभार सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी शाळेबाहेर लाक्षणिक उपोषण केले. भरमसाट फी, डोनेशन आणि लज्जास्पद वर्तन करणाऱ्या शिक्षक आणि संचालकांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण पूर्व विधानसभाप्रमुख नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर बसून शासन, शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाच्या उदासीनतेचा तीव्र निषेध केला. साई इंग्लिश स्कूलमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बेकायदेशीरपणे शाळा व्यवस्थापनाचे अधिकारी कार्यरत आहेत. शाळेमध्ये बेशिस्तपणा, गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या अश्लील चाळ्यांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. असंख्य पालकांनी तक्रारी केल्या तरीही शिक्षणाधिकारी, धर्मादाय आयुक्त, पोलीस प्रशासन आणि महापालिका कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. या निष्क्रियतेविरोधातच हे आजचे उपोषण आहे. यावेळी युवासेना कल्याण पूर्व शहराधिकारी अॅड. नीरज कुमार, उपशहरप्रमुख शांताराम डिगे, विभागप्रमुख अधिकारी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करत असतील आणि शासन फक्त बघ्याची भूमिका घेत असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही. आमचा संघर्ष हा विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या हक्कांसाठी असून गरज पडल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी नारायण पाटील यांनी दिला.

किरण निचळ, राजेंद्र गायकवाड, आत्माराम डिगे, रिंकू पाठक, उपविभागप्रमुख विलास तुरकने, शाखाप्रमुख दत्ताराम नार्वेकर, उपशाखाप्रमुख प्रसाद भंडारी, उपविभागप्रमुख बाळा जाधव, आप्पा अतकरे, रवींद्र कडने, प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;