टेस्लाच्या रोबोटॅक्सीने वाहतुकीचे नियम मोडले

टेस्लाच्या रोबोटॅक्सीने वाहतुकीचे नियम मोडले

अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने नुकतीच विनाड्रायव्हरची रोबोटॅक्सी लाँच केली आहे, परंतु लाँच होऊन आठवडा उलटत नाही तोच ही टॅक्सी वादाच्या भोवऱयात सापडली आहे. टेस्लाच्या सेल्फ-ड्रायव्हिंग रोबोटॅक्सीने वाहतुकीचे नियम मोडले आहेत. यामुळे अमेरिकेची वाहन सुरक्षा नियामक एजन्सी एनएचटीएसए (नॅशनल हायवे ट्रफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन) ने चौकशी सुरू केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमध्ये स्पष्ट दिसत आहे की, टेस्लाची ड्रायव्हरलेस कार ट्रफिक नियम मोडत आहे. टेस्लाचे मॉडल वाय कार ही फक्त डाव्या बाजूला वळा असे लिहिलेले असतानाही ती इंटरसेक्शनमध्ये घुसत आहे. चुकीच्या दिशेने प्रवेश करत आहे. यानंतर डबल यलो लाइन पार करून पुन्हा योग्य मार्गाने धावत आहे. हे सरळ सरळ कायद्याचे उल्लंघन आहे. ट्रफिक नियमाचे उल्लंघन आहे. अन्य दुसऱया एका व्हिडीओत ड्रायव्हरलेस मॉडल वाय कारमध्ये दोन व्यक्ती मागे बसलेले आहेत. स्क्रीनवर पूल ओव्हर बटन दाबल्यास कार बाजूला कुठे तरी थांबवली पाहिजे, परंतु बटन दाबल्यानंतर कार थेट मधोमध थांबवण्यात आली. हे खूपच धोकादायक मानले जात आहे. या कारने वेगाच्या मर्यादेचेसुद्धा उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. 48 किलोमीटरचा ताशी वेग पार करून लगेच 56 किलोमीटरचा वेग पकडल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

हिंदुस्थान अंतराळ साधनांच्या सुरक्षेबाबतही सजग आहे. चांद्रयान, गगनयान आणि अन्य सॅटेलाईट प्रोजेक्ट पाहता एस-500ची अँटी सॅटेलाईट क्षमता फायदेशीर ठरू शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;