पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर आत्मघाती हल्ला; 13 सैनिकांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी

पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर आत्मघाती हल्ला; 13 सैनिकांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शनिवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 13 सैनिकांचा मृत्यू झाला. तर 10 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर वझिरीस्तानच्या वायव्य जिल्ह्यातून लष्करी ताफा जात असताना हा हल्ला झाला. हा भाग अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आहे. सध्या या भागात तणाव असून दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे.

या हल्ल्यात आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन ताफ्यावर आदळले. त्यामुळे मोठा स्फोट झाला. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा त्याच्याशी संबंधित दहशतवादी गटाने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर लष्कर आणि सुरक्षा दलांना परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच जखमींना जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

2025 च्या जागतिक दहशतवाद निर्देशांकाच्या अहवालानुसार 2024 मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढीमुळे पाकिस्तान आता जगातील दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानसारखे भाग अतिरेकी कारवायांचे केंद्र बनले आहेत, जिथे सुरक्षा दल आणि नागरिक दोघांनाही सतत लक्ष्य केले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;