Parag Jain – आयपीएस अधिकारी पराग जैन यांची RAW च्या प्रमुखपदी नियुक्ती

Parag Jain – आयपीएस अधिकारी पराग जैन यांची RAW च्या प्रमुखपदी नियुक्ती

देशाची गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या (Research & Analysis Wing) प्रमुखपदी 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. विद्यमान ‘रॉ’ प्रमुख रवी सिन्हा यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने पराग जैन यांच्या नावाला मान्यता दिली आहे. जैन हे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. 1 जुल रोजी ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

पराग जैन हे बऱ्याच काळातापासून ‘रॉ’सोबत काम करत आहेत. ‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत त्यांनी अनेक मिशन पूर्णत्वास नेले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आणि बालाकोट एअर स्ट्राईकसारख्या महत्त्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सहभाग होता. ते एव्हीएशन रिसर्च सेंटरचे प्रमुखही असून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची ओळख पटवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;