Jalna News – डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनाईल वापरले, गर्भवती महिलेच्या पोटाची त्वचा जळाली

Jalna News – डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनाईल वापरले, गर्भवती महिलेच्या पोटाची त्वचा जळाली

जालन्यातील भोकरदन येथील रुग्णालयात एक संतापजनक घटना समोर आली आहे. डॉपलर टेस्टवेळी जेली ऐवजी फिनाईल वापरल्याने गर्भवती महिलेच्या पोटाची त्वचा जळाली. रुग्णालयातील या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकाराबाबत संबंधित डॉक्टर आणि नर्सची चौकशी करण्यात येईल असे जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

खापरखेडा गावातील रहिवासी असलेल्या शीला संदिप भालेराव या महिलेला ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी महिलेला सोनोग्राफी सेंटरमध्ये डॉपलर टेस्टसाठी नेण्यात आले. यावेळी बाळाचे हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी शीला यांना डॉपलर टेस्टला नेण्यात आलं. नर्सने टेस्टसाठी जेलीऐवजी शीला यांच्या पोटावर चुकून फिनाईलसारखं केमिकल लावलं. यामुळे त्यांच्या पोटाची त्वचा भाजून निघाली.

सध्या बाळ आणि आई दोघेही सुखरुप आहेत. दरम्यान रुग्णालयात अ‍ॅसिड वापरले जात नाही. जे वापरलं गेलं ते फिनाईल असावं, असं वैद्यकीय अधिक्षकांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अधीक्षकांना याबाबत चौकशी करून अहवाल करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;