वजन कमी करण्यासाठी हजार उपाय करुन थकलात, मग हे फळ खाऊन बघा!

वजन कमी करण्यासाठी हजार उपाय करुन थकलात, मग हे फळ खाऊन बघा!

वजन कमी करण्यासाठी तुम्ही हजार उपाय करुन थकलेले असाल तर, आता तुम्ही बिनधास्त राहा. वजन कमी करण्यासाठी चिकू हे फळ बहुमोली आहे. चिकू हे फळ तसं दुर्लक्षित आहे. परंतु याचे फायदेही तितकेच महत्त्वाचे आहेत. चिकू या फळाला फार मागणी नसली तरी, चिकूचा मिल्कशेक मात्र अनेकांना प्रिय आहे. चिकूचे फायदे अगणित असल्यामुळे, चिकू चवीने खाण्यापेक्षा तो फायद्यांसाठी तरी नक्कीच खायला हवा. कोणत्याही सीझनमध्ये त्वचा निरोगी ठेवण्यासाठी चिकूचे सेवन करू शकता. चिकूमध्ये असलेले टॅनिन दाहक-विरोधी म्हणून काम करतात. या परिणामामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या जसे की अन्ननलिका फुगणे, पोटात गॅस, पोटदुखी कमी होण्यास मदत होते.

चिकू खाण्याचे अगणित फायदे

चिकूमध्ये व्हिटॅमिन अ आणि ब जीवनसत्व असतात. लोह, कॅल्शियम, फायबर, अॅन्टी ऑक्सिडाइज सारखे घटक असतात. या फळाचं नियमित सेवन केल्यानं कर्करोगाच्या आजार होण्याचा धोका कमी होऊ शकतो. याशिवाय शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

चिकू त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-ई, ए आणि सी त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. इतकेच नाही तर त्यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील आहेत जे त्वचा कोरडी होण्यापासून आपल्याला वाचवतात.

Weight Loss Diet- वजन कमी करण्यासाठी आहारात ‘हे’ 5 सुपरफुड समाविष्ट करा

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चिकूचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चिकूच्या सेवनाने चयापचय नियंत्रित ठेवता येतो.

चिकूमध्ये आढळणारे पोषक तत्व दीर्घकाळ पोट भरल्यासारखे असतात. त्यामुळे भूक कमी लागते आणि वजनही सहज कमी करता येते.

चिकू हे फळ डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. या फऴामध्ये अ जीवनसत्व असल्यानं डोळ्यांसाठी हे फळ गुणकारी आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण याचं सेवन करू शकतात.

चिकू खायलाही चांगला आणि शरीरासाठी गुणकारी आहे. रोज एक चिकू खाल्ल्यानं आपलं सौंदर्य आणि त्वचा अधिक निरोगी होण्यास मदत होते.

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘नागरी उड्डाण’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी ‘नागरी उड्डाण’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळे यांची मागणी
साधा माणूसही स्वस्तात विमान प्रवासात जात असल्याच्या जाहिराती केल्या जातात. मात्र, सरकारचे सुरक्षिततेला प्राधान्य नाही. नागरी उड्डाण क्षेत्रात अनेक वर्षांपासून...
मुंबईत उतरण्याआधी विमानाच्या घिरट्या, टर्ब्युलन्सवेळी प्रवाशांची आरडाओरड! अहमदाबाद घटनेनंतर भिती कायम
जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला कोडं पडलंय की एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी? – संजय राऊत
नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने लटकावला, 24 जूनपासून भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार
नवी मुंबईत 27 कामगारांना वायुबाधा, ‘स्वास्थ्य अ‍ॅग्रो’मध्ये गॅसगळती; 15 महिलांचा समावेश
Air India Plane Crash – नव्या घरात प्रवेश करण्याचे स्वप्न अधुरे
दिव्यातील बेकायदा इमल्यांवर महापालिकेचा बुलडोझर, कोर्टाच्या आदेशानंतर आयुक्तांवर नामुष्की