बदलापुरात शिवसेनेच्या नव्या शाखेचे तोरण; लोकाभिमुख कामांचा झंझावात

बदलापुरात शिवसेनेच्या नव्या शाखेचे तोरण; लोकाभिमुख कामांचा झंझावात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बदलापूर शहरात नव्या शाखेचे तोरण बांधले आहे. त्या माध्यमातून लोकाभिमुख कामांचा झंझावात निर्माण केला असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार युवासेना शहर सचिव भावेश तांबे व महिला उपशहर संघटक दक्षता तांबे यांनी केला आहे. शिवसेनेची शाखा तसेच जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून बदलापूरवासीयांना न्याय दिला जाणार आहे.

शाखेचे उद्घाटन मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाले. शाखा उद्घाटन सोहळ्याला शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, अंगीकृत संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना बालहक्क संरक्षण संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष, महिला उपशहर संघटक दक्षता तांबे म्हणाल्या, शिवसेनेमुळे बदलापुरतील लैंगिक अत्याचार प्रकरणाला वाचा फुटली. शाळा आणि दोषींवर कारवाईसाठी बालहक्क आयोगातर्फे प्रशासकीय पाठपुरावा आपण केला होता.

बदलापूर ग्रामीण रुग्णालय येथे सोयीसुविधा वाढण्यासाठी दिलेली धडक, स्मार्ट मीटरला समाजसेवेचा वसा शहरात विविध ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी बदलापूर शहर सचिव आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर अध्यक्ष भावेश तांबे यांनी पाठपुरावा केला. याशिवाय सात वर्षांपासून बदलापूर गावामध्ये पाणी समस्या, नाला आणि कचऱ्याचा प्रश्न जटिल बनला होता. शिवसेनेने नगर परिषदेला याठिकाणी सुधारणा करण्यास भाग पाडल्याचे भावेश तांबे यांनी सांगितले.

विरोध, मुलांच्या शाळांच्या तक्रारीची सोडवणूक याबरोबरच शहरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय महिलादिनी सरकारी कर्मचारी महिला, आशा सेविका, महिला पोलीस यांचा सन्मान, नायर रुग्णालयात बदलापूरमधून जाणाऱ्या रुग्णांना तिथे तातडीची वैद्यकीय मदत, बदलापुरात बंद झालेली धूर फवारणी पुन्हा चालू करणे यासाठी शिवसैनिक कायमच तत्पर असल्याचेही दक्षता तांबे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;