बोईसरमध्ये तीन मुलांचा बुडून मृत्यू; भरावासाठी खोदलेला खड्डा ठरला काळ

बोईसरमध्ये तीन मुलांचा बुडून मृत्यू; भरावासाठी खोदलेला खड्डा ठरला काळ

बोईसर काटकर गावाच्या हद्दीतील हनुमाननगर येथे बिल्डरने इमारतीचा भराव करण्यासाठी बेकायदेशीर खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. बिल्डरच्या बेफिकिरीमुळे इमारतीच्या भरावासाठी खोदलेला खड्डा मुलांसाठी काळ ठरला. सूरज यादव (६) धीरज यादव (१२) या दोघा सख्ख्या भावांसह अंकित गुप्ता (१२) अशी मृत मुलांची नावे आहेत.

गणेशनगर येथे राहणारी चार मुले हनुमानगर येथे आज दुपारी खेळायला गेली होती. खेळत असताना तोल जाऊन ती खड्यात पडली. खड्डा खोल असल्याने मुले बुडाली. यातील एक मुलगा सुदैवाने वाचला. बाहेर येऊन त्याने आरडाओरडा केल्यानंतर नागरिक मदतीला धावले. मात्र तोपर्यंत सूरज, धीरज या सख्ख्या भावांसह अंकित या तिघांचा मृत्यू झाला होता. या तिन्ही मुलांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. बिल्डर, ठेकेदारांनी चिमुकल्यांचा जीव घेतला.

बोईसर परिसरात शासकीय वन व आदिवासी खातेदारांच्या बहुतांश जमिनी आहेत. या ठिकाणी बेकायदेशीर खोदकाम कोणी केले व तो खड्डा पावसापूर्वी बुजविण्यात का आला नाही, असा प्रश्न यानिमिताने विचारला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते काही बिल्डरांनी इमारतींचा भराव करण्यासाठी या परिसरात बऱ्याच ठिकाणी खोदकाम केले आहे. याशिवाय रेल्वे कॉरिडॉरसाठी ठेकेदारानेही खोदकाम करून माती चोरून नेली आहे. बेकायदा खोदकाम करणाऱ्या बिल्डर आणि ठेकेदारांनीच मुलांचा जीव घेतला असून संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;