विंडीजच्या स्टार क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप, गयानातील 11 पीडित महिला आल्या समोर

विंडीजच्या स्टार क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप, गयानातील 11 पीडित महिला आल्या समोर

सध्या क्रिकेटजगतात आपला लौकिक गमावलेल्या वेस्ट इंडीज संघाच्या स्टार क्रिकेटपटूवर बलात्काराच्या सनसनाटी आरोपामुळे अबू गमावण्याची नामुष्की आली आहे. गयानातील 11 महिलांनी (एक अल्पवयीन) सध्या विंडीज संघात खेळत असलेल्या स्टार क्रिकेटपटूने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मात्र, हे प्रकरण दाबण्याचा प्रकार केला जात असल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने समोर आली आहे.

दीड वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेनंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ब्रिस्बेन कसोटीत झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती गयानाच्या ‘केइतूर न्यूज’ने दिली होती आणि त्यानंतर या घटनेला स्पोर्ट्स मॅक्स टीव्हीने अधिक प्रभावी करण्याचे काम केले. 11 महिलांच्या आरोपांमुळे विंडीज क्रिकेट हादरले आहे. विशेष म्हणजे सध्या विंडीजचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत असताना, हा प्रकार उघडकीस आल्यामुळे या प्रकरणाचा संघाच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी गयानातील एक महिला सर्वप्रथम पुढे आली. त्यानंतर अन्य महिलांनीही धाडस करत आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. वृत्तपत्राच्या बातमीनुसार या प्रकरणाला दाबण्यासाठी काही व्यक्ती प्रयत्न करत असल्याचेही म्हटले जात आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दीड वर्षापूर्वीच याबाबतीत तक्रार केली होती आणि गयानातील सार्वजनिक अभियोजन संचालकांच्या कार्यालयाकडून याप्रकरणी आरोप दाखल करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती वकील निगेल ह्युजेस यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

दीड वर्षापूर्वी ब्रिस्बेन कसोटीत विंडीजने ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव केला होता. या कसोटीत शामर जोसेफने 8 विकेट घेत संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. या कसोटीत शामरसह केव्हिन सिंक्लेअर हे दोन गयानाचे खेळाडू खेळत होते. त्यापैकी शामर सध्या सुरू असलेल्या कसोटीतही खेळतोय.

विंडीज मंडळाला कल्पना नाही

बलात्काराच्या आरोपांबाबत क्रिकेट वेस्ट इंडीजचे अध्यक्ष डॉ. किशोर शालो यांना विचारले असता, त्यांनी याबाबत आपल्यालाही काहीही कल्पना नसल्याचे सांगितले. तसेच याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नाही. त्यामुळे हे प्रकरण विंडीज मंडळाने डोळ्यावर पट्टी बांधल्याचे बोलले जात आहे. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी अशीच शक्ती मागे असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;