स्वतःचा देश सोडून धनदांडग्यांचा परदेशाचा ओढा, यंदा 3500 कोट्यधीश हिंदुस्थान सोडणार

स्वतःचा देश सोडून धनदांडग्यांचा परदेशाचा ओढा, यंदा 3500 कोट्यधीश हिंदुस्थान सोडणार

कोटय़धीश धनदांडग्यांचे हिंदुस्थान सोडून परदेशात स्थायिक होणे सुरू आहे. एका अहवालानुसार, या वर्षी अंदाजे 3500 करोडपती देश सोडून अन्य देशांत स्थायिक होतील. दोन वर्षांपूर्वी ही संख्या 4300 एवढी होती. हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2025 नुसार, तब्बल 16500 धनवान ब्रिटन सोडणार आहेत. चीनमधून 7800 धनदांडगे अन्य देशांत जातील. फ्रान्समधून 800, स्पेनमधून 500 आणि जर्मनीतून 400 करोडपती देश सोडून जाऊ शकतात. अहवालानुसार, 2014 ते 2024 या काळात देशातील करोडपतींच्या संख्येत 72 टक्के इतकी वाढ झाली आहे. अहवालानुसार, जे करोडपती देश सोडून जातील, त्यांची संपत्ती 26.2 अब्ज डॉलरएवढी असेल.

यूएई, अमेरिकेला पसंती

संयुक्त अरब अमिराती (यूएई) सर्वाधिक करोडपतींना आकर्षित करत आहे. यंदा सुमारे 9400 लोक यूएईला स्थायिक होतील, असा अंदाज आहे. यूएईनंतर दुसरा नंबर अमेरिकेचा आहे. अमेरिकेत 7500 लोक जातील असा अंदाज आहे. कर धोरण, लाइफ स्टाईल आणि गोल्डन व्हिसा या पर्यायांमुळे ब्रिटन, हिंदुस्थान, रशिया, साऊथ ईस्ट आशिया आणि आफ्रिकेच्या लोकांसाठी सौदी अरेबिया पहिली पसंती बनला आहे. सौदी अरेबिया धनदांडग्यांचे पेंद्र म्हणून नावारूपास येतंय. 2025 या वर्षी सौदीमध्ये 2400 करोडपती स्थायिक होण्याचा अंदाज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;