समानता आणि धर्मनिरपेक्षता भाजप- संघाला बोचते, राहुल गांधी यांची टीका

समानता आणि धर्मनिरपेक्षता भाजप- संघाला बोचते, राहुल गांधी यांची टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावरून भाजपला व संघाला फटकारले आहे.

”RSS चा पर्दाफाश झाला आहे. समानता, धर्मनिरपेक्षता आणि न्यायाचे धडे संविधानातून दिले जातात त्यामुळे ते त्यांना बोचते. संघ व भाजपला संविधान नको, मनुस्मृती हवी आहे. हे बहुजनांना आणि गरिबांचे सर्व अधिकार काढून घेऊन त्यांना गुलाम बनवायचे आहे. संविधानासारखे ताकदवर शस्त्र त्यांच्याकडून हिसकावून घेणे हा त्यांचा अजेंडा आहे”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजप संघावर टीका केली.

यासोबतच संघाचे हे मनसुबे आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ”संघाने स्वप्न बघणे थांबवले पाहिजे. आम्ही ते कधीच पूर्ण होऊ देणार नाही. प्रत्येक देशभक्त शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाचे रक्षण करेल, असेही राहुल गांधी म्हणाले.

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत संविधानाच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून टाकण्याची मागणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;