आम्ही जे हवं ते करू शकतो! इराण-इस्रायल युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वळवला ‘या’ मुद्द्याकडं मोर्चा

आम्ही जे हवं ते करू शकतो! इराण-इस्रायल युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वळवला ‘या’ मुद्द्याकडं मोर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्तेत येताच काही मोठे निर्णय घेतले होते. ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टेरिफ म्हणजेच जशास तसे अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर या योजनेला 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत 9 जुलै रोजी संपत आहे. याच बाबत आता ट्रम्प यांनी मोठे विधान केले असून रेसिप्रोकल टेरिफच्या अंतिम मुदतीबाबत अनिश्चिततेचे संकेत दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. माध्यमांनी त्यांनी रेसिप्रोकल टेरिफच्या अंतिम मुदतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमची इच्छा, आम्ही जे हवे ते करू शकतो. त्यामुळे ट्रम्प रेसिप्रोकल टेरिफची मुदत वाढवते की लागू करते हे पुढील महिन्यातच स्पष्ट होईल.

अमेरिका इराणला 30 अब्ज डॉलर्स देण्याचे वृत्त सपशेल खोटे आणि मूर्खपणाचे; ट्रम्प सोशल मीडियावर संतापले

आमची इच्छा, आम्हाला जे काही करायचे ते आम्ही करू शकतो. आम्ही मुदत वाढवूही शकतो आणि कमीही करू शकतो. माझी तर मुदत कमी करायची इच्छा आहे. त्यानंतर अभिनंदन, तुम्ही फक्त 25 टक्के टेरिफ भरत आहात, अशी पत्रही सर्वांना पाठवण्याची इच्छा आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

…तर इराणवर पुन्हा हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;