काळजी घ्या! कोरोना पुन्हा पसरतोय; रुग्णसंख्या 5 हजारांवर, 24 तासात 764 जणांना विषाणूची लागण

काळजी घ्या! कोरोना पुन्हा पसरतोय; रुग्णसंख्या 5 हजारांवर, 24 तासात 764 जणांना विषाणूची लागण

गेला गेला म्हणता म्हणता कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 764 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, यामुळे रुग्णसंख्या 5 हजारांवर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 5364 वर पोहोचला होता. गेल्या 24 तासांमध्ये 764 रुग्णांची नोंद झाली, तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 2 मृत केरळ, तर एक पंजाब आणि एक कर्नाटकमधील आहे.

केरळ राज्यात सर्वाधिक 192 रुग्णांची नोंद झाली, तर महाराष्ट्रात 114 रुग्ण आढळले. त्यानंतर गुजरातमध्ये 107, पश्चिम बंगालमध्ये 28 आणि दिल्लीमध्ये 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

‘पॉवर’फूल लवंग तेल! लैंगिक समस्येसह ‘या’ आजारांवरही आहे वरदान!!

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये जानेवारीपासून 1276 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पुण्यात सर्वाधिक 44, तर मुंबईमध्ये 37 रुग्णांची नोंद झाली.

तुळशीच्या पानांचा अशापद्धतीने वापर करा, मिळतील अगणित फायदे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;