माझं ते माझं अन् तुझं ते माझ्या बापाचं ही भाजपची वृत्ती; संजय राऊत कडाडले

माझं ते माझं अन् तुझं ते माझ्या बापाचं ही भाजपची वृत्ती; संजय राऊत कडाडले

शिवसेना हा ओरबाडणारा पक्ष नाही. माझे ते माझे अन् तुझे ते माझ्या बापाचे ही भाजपची वृत्ती आहे आणि त्या वृत्तीमुळेच आम्हाला बाहेर जावे लागले. तो दुर्गुण आमच्यात नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मान, सन्मान, प्रतिष्ठा सगळ्यांना असते. पक्ष लहान असो किंवा मोठा, त्या पक्षाबरोबर सन्मानाने चर्चा करावी ही आमची भूमिका आहे. ही भूमिका आम्ही लोकसभेला आणि विधानसभेलाही बजावली, असेही राऊत म्हणाले. शिवसेना-मनसेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

ते पुढे म्हणाले की, पक्षाच्या कोणत्याही बैठकीत या विषयावर या क्षणी चर्चा झालेली नाही. पण आमच्या पक्षाची मानसिकता, खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका पारदर्शक आहे. मराठी माणसाची एकजूट रहावी, मराठी माणसाने एकत्रित पुढले राजकारण करावे ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे.

काल अमित शहा यांच्यासारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला डिवचून गेले, अशा विंचवांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्रित येऊन ठेचाव्या ही भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांचीही आहे. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत आणि दोनच समविचारी नेते आहेत. एक उद्धव ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे.

शिंदेंची ओळख लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री; संजय राऊत यांचा सणसणीत टोला, अमित शहांवरही घणाघात

भाजप आणि त्यांच्या बगलबच्च्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रकियेशी संबंधित व्हिडीओ, बूथवरील सीसीटीव्ही फुटेज, संग्रहित फोटो निवडणुकीनंतर 45 दिवसांत नष्ट करा, असे फर्मान राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना काढले आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, भाजप आणि त्यांच्या बगलबच्च्यांना संरक्षण देण्यासाठी आयोगाने नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक आणि त्या संदर्भात आयोगाने घेतलेल्या भूमिका संशयास्पद आहेत. मतदार याद्या, ईव्हीएमच्या तक्रारी, बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार याबाबत सगळे पुरावे राहुल गांधी यांनी मागितलेले आहेत. महाराष्ट्रात शेवटच्या तासात 40-60 लाख मतदान वाढले. हे मतदान कसे, कुठे वाढले याबाबत आम्ही मतदान केंद्रावरील फुटेज मागितल्यानंतर हा नियम बदलण्याचा प्रयत्न केला असेही राऊत म्हणाले.

निवडणुकीचे फुटेज आता 45 दिवसांत नष्ट करणार, आयोगाचे सर्व राज्यांना फर्मान

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;