Yoga Day 2025 – कामात उत्साह वाढवा, ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या-बसल्या करा ही योगासनं

Yoga Day 2025 – कामात उत्साह वाढवा, ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या-बसल्या करा ही योगासनं

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत व्यायाम, योगसाधना याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आता लोकांना दिवसातून 8 ते 9 तास एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते. त्यामुळे खांदे, मान, पाठ, कंबर आणि पाय दुखणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. या आरोग्य समस्या टाळण्यासाठी दररोज 30 ते 40 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार आहे. चला तर मग आज आपण काही योगासनांबद्दल जाणून घेऊ, ज्या ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून करता येतात.

आपल्या दैनंदिन जीवनात योगसाधनेला खूप महत्त्व आहे. योगासन केल्यामुळे तुमच्या स्नायूंची ताकद तर वाढतेच, शिवाय शरीर लवचिक बनते आणि स्नायूंच्या वेदनांपासूनही आराम मिळतो. बराच वेळ एकाच जागी बसल्याने कामातही मन लागत नाही. त्यामुळे थोडा वेळ शरिराला आराम देणे गरजेचे असते.

उर्ध्व हस्तासन करा

80+ Urdhva Hastasana Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

तुम्ही खुर्चीवर बसून उर्ध्व हस्तासन करू शकता. यामध्ये खुर्चीवर बसताना पाठीचा कणा सरळ ठेवा. आणि ताडासनात केल्याप्रमाणे तुमचे दोन्ही हात वर घ्या. हातवर घेताना श्वास घ्या. मग काही सेकंदांसाठी याच स्थितीत रहा आणि नंतर श्वास सोडताना तुमचे हात सामान्य स्थितीत आणा. तुम्ही हे 5 ते 10 वेळा करू शकता.

गोमुखासन

गौमुखासनखुर्चीवर बसून तुम्ही गोमुखासन करू शकता. ज्यामुळे तुमची मुद्रा सुधारण्यास मदत होते. पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. यानंतर उजवा हात वरच्या बाजूने पाठिच्या दिशेने न्या मग डावा हात कंबरेच्या बाजूने पाठिच्या दिशेने न्या. यानंतर दोन्ही हात एकमेकांना मिळवा.

मानेचे व्यायाम

Chair Yoga" Immagini - Sfoglia 140 foto, vettoriali e video Stock | Adobe Stock

तज्ज्ञांच्या मते खुर्चीवर बसून सतत काम केल्याने पाठीवर, मानेवर ताण येतो. यामुळे मानेचे व्यायाम करणे गरजेचे आहे. मानेच्या व्यायामामुळे मानदुखीपासून आराम मिळतो. यासाठी तुमचे डोके पुढे वाकवा नंतर आरामात वर पाहा आणि नंतर डावीकडे आणि उजवीकडे पाहा. हे 5 ते 7 वेळा करा. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

1. नियमित योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. 

2. योगामुळे तणाव कमी होतो, लवचिकता वाढते, स्नायू मजबूत होतात आणि एकाग्रता वाढते.

3. योगामुळे चांगली झोप लागते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते. 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;