दोस्त दोस्त ना रहा, व्यापार व्यापार ना रहा! डोनाल्ड ट्रम्प-एलॉन मस्क यांची दोस्ती तुटली, महाभियोग आणा… जेडी वॉन्स यांना राष्ट्राध्यक्ष करा

दोस्त दोस्त ना रहा, व्यापार व्यापार ना रहा! डोनाल्ड ट्रम्प-एलॉन मस्क यांची दोस्ती तुटली, महाभियोग आणा… जेडी वॉन्स यांना राष्ट्राध्यक्ष करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क या दोघांमधील दोस्ती आता तुटली असून या दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. मस्क यांनी ट्रम्प यांच्या धोरणावर उघडपणे टीका करायला सुरुवात केली असून त्याला डोनाल्ड ट्रम्प यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही मित्रांचे भांडण एवढय़ावरच थांबले नाही तर मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग खटला चालविला जावा, अशी मागणी केली. ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरून हटवून त्या जागी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॉन्स यांना राष्ट्राध्यक्ष करण्यात यावे अशी जोरदार मागणी केलीय.

ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यावर मिळणारी टॅक्समधील सूट घालवण्यासाठी एक विधेयक आणले आहे. जो बायडन सरकार नव्या ईव्ही खरेदीवर 7500 डॉलरची टॅक्स सूट देत होते, परंतु ट्रम्प सरकारची ही सूट देण्याची तयारी नाही.

या प्रस्तावाला मस्क यांचा विरोध आहे. या नव्या विधेयकानुसार, ज्या कंपन्यांनी 2009 ते 2025 च्या काळात दोन लाख ईव्हीची विक्री केली आहे, त्या कंपन्यांना सरकारकडून सूट मिळणार नाही. हा मस्क यांना सर्वात मोठा झटका मानला जात आहे. तसेच अमेरिकी अंतराळ एजन्सी नासामध्ये मस्क हे आपले विश्वासू जेरेड इसाकमॅन यांना अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्त करण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु ट्रम्प यांनी याकडेही दुर्लक्ष केले आहे. जर इसाकमॅन नासामध्ये अॅडमिनिस्ट्रेटर बनले असते तर याचा थेट फायदा मस्क यांची कंपनी स्पेसएक्सला झाला असता. हे दोन्ही निर्णय मस्क यांच्यावर कुरघोडी करणारे आहेत.

मस्क यांना अमेरिकेतून हाकला

मस्क आणि ट्रम्प यांच्या वादात आता अमेरिकन मीडियाने उडी घेतली आहे. मस्क यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. मस्क यांच्या इमिग्रेशन स्टेट्सचा तपास होणे गरजेचे असून त्यांना अमेरिकेतून हाकलायला हवे, असे अमेरिकी मीडिया टायकून स्टीव्ह बॅनन यांनी म्हटले आहे. ते ‘व्हाईट हाऊस’चे माजी अधिकारी आहेत. मस्क यांची कंपनी स्पेसएक्सला जप्त करून ते आपल्या ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणीसुद्धा त्यांनी ट्रम्प यांच्याकडे केली आहे.

ट्रम्प माझ्यामुळे राष्ट्राध्यक्ष!

संतापलेल्या मस्क यांनी ट्रम्प यांच्या देशांतर्गत धोरण आणि कर विधेयकावर जोरदार टीका केली आहे. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्रम्प यांना कृतघ्न म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे माझ्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. जर मी त्या ठिकाणी नसतो तर ट्रम्प निवडणूक हरले असते, असा दावा मस्क यांनी केला आहे. ट्रम्प यांनी या विधेयकाला ‘बिग ब्यूटीफुल बिल’ असे म्हटले आहे, तर मस्क यांनी या विधेयकाला ‘खूप वाईट’ आहे असे म्हटलेय. तसेच ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जुन्या टिप्पण्या सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. ज्यामध्ये त्यांनी अमेरिकन सरकारच्या वाढत्या खर्च आणि तुटीबद्दल चिंता व्यक्त केलीय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;