DGCA ची एअर इंडियावर कडक कारवाई; 3 अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश, 10 दिवसांत अहवाल मागवला

DGCA ची एअर इंडियावर कडक कारवाई; 3 अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश, 10 दिवसांत अहवाल मागवला

एअर इंडियामधील क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित निष्काळजीपणा गांभीर्याने घेत भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व संबंधित जबाबदाऱ्यांवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन अधिकारी ऑपरेशनल त्रुटींसाठी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे आणि आता त्यांना कोणत्याही क्रू व्यवस्थापन कामापासून दूर ठेवण्यात येईल.

डीजीसीएने एअर इंडियावर कठोर कारवाई केली आहे. एअर इंडियाला त्यांच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित सर्व भूमिकांमधून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. 3 अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश डीजीसीएने एअर इंडियाला दिले आहेत. तसेच 10 दिवसांत अहवाल मागितला आहे. डीजीसीएने एअर इंडियाला या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आणि त्याबाबतची माहिती देणारा अहवाल 10 दिवसांच्या आत संस्थेला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एअरलाइनच्या सुरक्षा आणि ऑपरेशनल मानकांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

12 जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून डीजीसीएने एअर इंडियाला त्यांच्या वेळापत्रक प्रक्रिया सुधारण्यास सांगितले आहे. डीजीसीएने असेही स्पष्ट केले आहे की आता उड्डाण सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

12 जून रोजी झालेल्या या भयानक विमान अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांना जीव गमवावा लागला. टेकऑफ दरम्यान विमानाचे संतुलन बिघडल्याने आणि ते जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीशी आदळल्याने हा अपघात झाला. या घटनेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेसमध्ये जेवणाऱ्या अनेक डॉक्टरांचाही मृत्यू झाला. त्यानंतर डीजीसीएकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;