महाराष्ट्रातील निवडणूक त्यांनी जिंकली नसून चोरली; संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रातील निवडणूक त्यांनी जिंकली नसून चोरली; संजय राऊत यांचा घणाघात

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रच्या विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याबाबत सविस्तरपणे पाच मुद्द्यांद्वारे माहिती दिली आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपले मत मांडले. राहुल गांधी यांनी सर्व सविस्तरपणे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील निवजणूक भाजपने जिंकली नसून चोरली आहे, हे स्पष्ट झाले, असा घणाघात त्यांनी केला.

निवडणूक मतमोजणीच्या दिवशी सुरुवातीला मोदी पिछाडीवर होते. वाराणसीत नरेंद्र मोदींचा पराभव निश्चित झाला होता. त्यासाठी दिल्लीतून यंत्रणा हलली. मतमोजणी थांबवण्यात आली. मतदान केंद्रातील वीज घालवण्यात आली. त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला. सर्व डेटा उडाला, नवीन मशीन मागवण्यात आल्या. दोन तासात त्यांनी ही गडबड आणि गोंधळ घातला. मतमोजणी हायजॅक केली आणि मोदींचा विजय घडवून आणला. तोच प्रकार महाराष्ट्रात करण्यात आला. महाराष्ट्रच्या निवडणुकीत त्यांनी विजय चोरला. निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, ईव्हीएम मशिन हायजॅक केल्या. शेवटच्या दोन तासात 60 ते 65 लाख मतदान वाढवले गेले. ठरलेल्या सेटिंगप्रमाणे हे सर्व करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही मुद्दा आतंरराष्ट्रीय स्तरावर नेला. हिंदुस्थानची लोकशाही किती धोकादायक वळणावर आहे, हे जगाला यातून समजले, असे संजय राऊत म्हणाले.

जगभरात अनेक ठिकाणी देशाची लोकशाही आणि मोदी आणि सरकारचा अपमान होत आहे. त्याला हेच कारण आहेत. मोदी आणि त्यांचा पक्ष लोकशाही मनत नाही. हुकूमशाही पद्धतीने ते कामकाज करत आहेत. त्यांच्याकडून निष्पक्ष निवडणुका घेतल्या जात नाहीत. हे जगाला समजल्यामुळे मोदी आणि सरकारचा जगभरात अपमान होत आहे. तसेच त्यांच्यामुळे देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;