ऑगस्ट क्रांती मैदानात नमाजासाठी हवी परवानगी, हायकोर्टात याचिका; सांस्कृतिक विभागाला निर्णय घेण्याचे आदेश

ऑगस्ट क्रांती मैदानात नमाजासाठी हवी परवानगी, हायकोर्टात याचिका; सांस्कृतिक विभागाला निर्णय घेण्याचे आदेश

ईदनिमित्त ऑगस्ट क्रांती मैदानात नमाज अदा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. याची दखल घेत न्यायालयाने सामाजिक न्याय, सांस्कृतिक विभागाचे सचिव किंवा महापालिका उपायुक्तांनी निर्णय घ्यावा, असे आदेश  दिले.

उमर अब्दुल जब्बार गोपालीनी यांनी अॅड. बुरान बुखारी व अॅड. हुसेन शेख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.  न्या. डा. नीला गोखले व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.  ऑगस्ट क्रांती मैदानावर कार्यक्रमास परवानगी देण्याचे विशेष अधिकार सामाजिक न्याय, सांस्कृतिक विभागाचे सचिव व स्थानिक पालिका उपायुक्तांना आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी त्यांच्याकडे अर्ज करावा,  असे कोर्टाने स्पष्ट केले.

शनिवारी किंवा रविवारी हवी परवानगी 

गेली 50 वर्षे ऑगस्ट क्रांती मैदानावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता नमाज अदा केली जाते. या वर्षी यासाठी परवानगी नाकारण्यात आली. परवानगी नाकारण्याचे कोणतेही ठोस कारण दिले गेले नाही. शनिवारी किंवा रविवारी या मैदानावर नमाज अदा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;