मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपाचं काय चाललंय? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपाचं काय चाललंय? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

आपला कोणत्याही भाषेला विरोध नाही. मात्र, जबरदस्तीने लादल्या जाणाऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपचा महाराष्ट्र आणि मराठीद्वेष आता उघड झाला आहे. भाजपने बजरदस्तीने लादलेल्या भाषा सक्तीला राज्यातून विरोध होत आहे. याविरोधात मराठी माणूस पेटून उठाला आहे. याविरोधात आंदोलने होत आहेत. मात्र, हे सर्व सुरू असताना मागल्या दाराने मराठीद्वेषी भाजपची कारस्थाने सुरू आहेत. त्याकडे लक्ष वेधत आदित्य ठाकरे यांनी मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपाचं काय चाललंय? असा संतप्त सवाल केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच! त्याविरुद्ध आंदोलन सुरु असताना आणि मराठी माणूस पेटून उठलेला असताना, आपल्या लक्षात येतंय का की मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपाचं काय चाललंय? गिरगाव चौपाटी येथे उद्धवसाहेबांनी मुंबईत सुरु केलेलं ‘मराठी रंगभूमी दालन’ गुपचूप रद्द करायचं, तिसरीकडे मराठी भाषा भवनात इतर कार्यालयं घुसवून त्याचं महत्व कमी करायचं आणि त्यातूनही मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर करुन घोंगडं भिजवत ठेवायचं! हे सगळं कश्यासाठी करतंय भाजपा? गिरगाव चौपाटी येथे मराठीला विरोध कोणाचा असेल? स्थानिकांचा तर नव्हता, मग स्थानिक भाजपा आमदाराने केला का? की कुठल्या बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? ह्याचे उत्तर महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा देणार का? आणि ह्यांचा हा खेळ आपण मुंबईकर वेळेत ओळखणार का?

गिरवाव चौपाटीच्या जागेवर भाजपचा डोळा असून ही जागा भाजपला बिल्डर मित्रांना द्यायची आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे. स्थानिक भाजप आमदाराचा मराठीला विरोध का केला आहे. मुंबईकरांनी भाजपचा हा डाव वेळेत ओळखावा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;