863 हेक्टरवरील पिके, फळबागा मातीमोल, अहिल्यानगर जिह्यात नेवासा तालुक्यात सर्वाधिक नुकसान

863 हेक्टरवरील पिके, फळबागा मातीमोल, अहिल्यानगर जिह्यात नेवासा तालुक्यात सर्वाधिक नुकसान

अहिल्यानगर, गेल्या 15 दिवसांत जिह्यात सरासरी 56.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत 103 टक्के पाऊस झाला आहे. या वादळी पावसाने 863.29 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. जवळपास दीड हजार शेतकऱयांना आर्थिक फटका बसला आहे. या पावसाने दोन व्यक्ती दगावल्या असून, अन्य दोघे जखमी झाले आहेत.

अहिल्यानगर जिह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 448.1 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. त्यानुसार जून महिन्यात 108.7 मि.मी. पाऊस होणे गरजेचे आहे. या महिन्यातील 15 दिवसांचा कालावधी संपला आहे. या पंधरा दिवसांत सरासरी 54.1 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना, 56.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक 173.7 मि.मी. पाऊस झाला. याशिवाय श्रीगोंदा, नगर, कर्जत, शेवगाव, राहुरी, संगमनेर आदी तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वांत कमी 68 टक्के पाऊस कोपरगाव तालुक्यात झाला आहे.

पंधरा दिवसांच्या कालावधीत झालेल्या वादळी पावसाने अहिल्यानगर, जामखेड, कर्जत, नेवासा, शेवगाव, पाथर्डी व संगमनेर आदी तालुक्यांना झोडपून काढले आहे. या सात तालुक्यांतील 1 हजार 496 शेतकऱयांच्या 863.69 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, मका, बाजरी, आंबा, पेरू, संत्रा, डाळिंब, भुईमूग, केळी, टोमॅटो, कोबी, दोडके, शेवगा, पपई, मोसंबी आदी पिके आणि फळबागांचे नुकसान केले आहे.

1 जूनला झालेल्या पावसाने कर्जत तालुक्यातील 11 गावांना फटका दिला. या गावांतील 211 शेतकऱयांच्या 100.60 हेक्टर पिकांचे नुकसान केले. 11 जूनला झालेल्या वादळी पावसाने 97 गावांतील 995 शेतकऱयांचे 587.14 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागा मातीमोल केल्या आहेत. 12 जून रोजी झालेल्या पावसाने 45 गावांतील 290 शेतकऱयांना आर्थिक फटका दिला आहे. या शेतकऱयांचे 175.55 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांत 863.29 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसानीचा फटका नेवासा तालुक्याला बसला आहे.

नगर जिह्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठय़ामध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेरण्या लांबल्या असून, शेतकऱयांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱयांनी मशागतीची कामे केली होती, ती वाया गेली आहेत.

पाऊस मिलिमीटरमध्ये

नगर ः 55.2 मि.मी., पारनेर ः 86.8 मि.मी., श्रीगोंदा ः 71.8, कर्जत ः63.6, जामखेड ः 50.3, शेवगाव ः62.4, पाथर्डी ः41.2, नेवासा ः 40.7, राहुरी ः70.8, संगमनेर ः 53.3, अकोले ः 43.6, कोपरगाव ः 41.9, श्रीरामपूर ः 42.9 मि.मी., राहाता ः 45.2 मि.मी.

नुकसान हेक्टरमध्ये

नेवासा ः 391.5 हेक्टर, कर्जत ः 237.84 शेवगाव ः 199.8. पाथर्डी ः 19.4, नगर ः 6.40 जामखेड ः 5 हेक्टर, संगमनेर ः 3.35 हेक्टर.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;