पालखीमार्गावर पाच किमीवर ‘आपला दवाखाना’

पालखीमार्गावर पाच किमीवर ‘आपला दवाखाना’

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 26 ते 30 जून या कालावधीमध्ये सातारा जिह्यातून मार्गक्रमण करत आहे. पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पाडेगाव (ता. खंडाळा) ते साधूबुवांचा ओढा फलटण या पालखीमार्गावर प्रत्येकी 5 किलोमीटर अंतरावर एक अशा 15 ठिकाणी तात्पुरता ‘आपला दवाखाना’ उभारण्यात येणार आहे. तसेच 4 आयसीयू पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा परिषद व राज्य शासनाचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाने नियोजन करत सातारा जिह्यात नीरा ते बरड या मार्गावरील प्रत्येक 5 किमी अंतरावर खंडाळ्यात पाडेगाव, बाळू पाटलाचीवाडी, सईबाई सोसायटी, बाळासाहेबनगर, खंडाळा चौक,
फलटणमध्ये वाळज, सुरवडी, निंभोरे, वडजल, नागरी आरोग्य केंद्र फलटण बाजार शाळेशेजारी, आपला दवाखाना सावतामाळी मंदिर, विडणी, पिंपरद, काजेगाव, साधूबुवाचा ओता, अशा 15 ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दकाखाना’ स्थापन केले आहेत.

माउलींचा पालखी सोहळा सातारा जिह्यात लोणंद, तरडगाक, फलटण, बरड येथे मुक्कामी राहणार आहे. त्यामुळे नोंदणीकृत असलेल्या 478हून अधिक दिंडय़ांचे आरोग्य क्यकस्थापन करण्यात आले आहे. पालखीमार्गाकर शासकीय 12 क खासगी 120, अशा मिळून 132 आरोग्य संस्था कार्यरत आहेत, त्यामध्ये 1 हजार 40 बेड उपलब्ध आहेत. तसेच प्राथमिक शाळांमध्ये 61, समाजमंदिरांत 11 अशा मिळून 72 ठिकाणी किकिध कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. पालखीतळ खंडाळा, तरडगाव, फलटण व बरड या ठिकाणी 4 आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद, तरडगाव, बरड व उपजिल्हा रुग्णालय फलटण या प्रत्येक ठिकाणी 5 खाटांचे आयसीयू जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येणार आहे. यामध्ये फिजिशियन, स्त्र्ााr रोगतज्ञ,
मॉनिटर, व्हेंटिलेटर उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. पाडेगाव ते बरड सातारा जिह्याच्या हद्दीपर्यंत 46 फिरती कैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 81 पथके कार्यरत

पालखीतळ 4, आरोग्य पथके, 4 आयसीयू पथके, 15 आपला दवाखाना, 46 फिरती वैद्यकीय पथके, 102 रुग्णवाहिका 6, 108 रुग्णवाहिका 6, अशी 81 पथके कारकऱयांच्या मदतीला राहणार आहेत. 600 प्रथमोपचार कीट दिंडीप्रमुखांना देण्यात आली आहेत. पाडेगाक ते बरड मार्गावर हॉटेल व ओटी संनियंत्रण पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पाणी शुद्धीकरणासाठी 34 पथके, टँकर फिलिंग पॉइंटसाठी 48 पथके स्थापन केली आहेत. जिल्हा परिषद आरोग्य किभाग सातारा, प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद व उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. पालखीमार्गावर आरोग्य सेवा देण्यासाठी 810 अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पित्ताचे दगड म्हणजे काय? ‘या’ 4 सवयी तुमच्या पित्ताशयातील दगडांना कारणीभूत, जाणून घ्या पित्ताचे दगड म्हणजे काय? ‘या’ 4 सवयी तुमच्या पित्ताशयातील दगडांना कारणीभूत, जाणून घ्या
आता पोट फुगणे, मळमळणे आणि पोटाच्या वरच्या भागात दुखणे यासारख्या समस्या आता 40 किंवा 50 वर्ष वयोगटातील लोकांपुरत्या मर्यादित राहिलेल्या...
कशी वाढवायची उंची? आहार, व्यायाम आणि झोपेच्या ‘या’ टिप्स करतील कमाल
पावसाळ्यात चुकूनही या डाळी खाऊ नका, नाहीतर पोटाच्या आजारांची समस्या वाढेल!
हृदयविकारापासून दूर राहण्यासाठी ‘या’ ट्रिक्स जाणून घ्या
रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ‘अ‍ॅरोहेड’चा मृत्यू; मेंदूच्या ट्युमरमुळे वयाच्या 11 व्या वर्षी निधन
IND vs ENG 1st Test – साई सुदर्शनचं पदार्पण; कोहली, द्रविड, गांगुलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री!
Air India ला अहमदाबादमधील विमान अपघाताचा मोठा फटका, बुकिंगमध्ये 30 ते 35 टक्के घट