‘ते’ शिवसेनेच्या करंगळीला पकडून राज्याचे, देशाचे राज्यकर्ते झाले – भास्कर जाधव

‘ते’ शिवसेनेच्या करंगळीला पकडून राज्याचे, देशाचे राज्यकर्ते झाले – भास्कर जाधव

गेली 35 वर्षे ज्यांच्याबरोबर मैत्री झाली, ज्यांचा महाराष्ट्रात नामोल्लेखही नव्हता, लवलेशही नव्हता ते शिवसेनेच्या करंगळीला पकडून आज ते या राज्यात नाही तर देशाचे राज्यकर्तेही झाले. देशाचे राज्यकर्ते झाल्यानंतर ज्या मित्रामुळे, ज्यांच्या विचारामुळे, ज्यांनी पहिल्यांदा या देशात हिंदुत्वाची भूमिका मांडली त्या शिवसेनेला संपवण्याचा हेतू भारतीय जनता पक्षाने ठेवला आहे. मात्र, आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

ािशिवसेनेच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2014 साली भाजपने कोणतेही कारण नसताना शिवसेनेबरोबरची युती तोडली. शिवसेनेविरोधात अख्या देशातील नेते मंडळी निवडणुकीच्या प्रचारात उतरवली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी एकटय़ाच्या बळावर 63 आमदार निवडून आणले. त्यानंतर अमित शहा युतीसाठी मातोश्रीवर येऊन गेले. मात्र. नंतर अचानक अजित पवारांबरोबर 80 तासांचे सरकार स्थापन करून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात जाधव यांनी केला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;