नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्या! प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्या! प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत राज्य सरकारने पेंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली. विमानतळाच्या नामकरणासाठी केंद्र सरकार टाळाटाळ करीत असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असूनही दिबांच्या नावाची घोषणा न झाल्यामुळे भूमिपुत्रांमध्ये अस्वस्थता आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, अतुल पाटील, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह पदाधिकाऱयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;