केंद्राच्या नव्या राष्ट्रीय धोरणाला हरताळ, राज्य सरकारच्या खोटारडेपणामुळे ‘हिंदी’भाषा पहिलीपासून अनिवार्यच!

केंद्राच्या नव्या राष्ट्रीय धोरणाला हरताळ, राज्य सरकारच्या खोटारडेपणामुळे ‘हिंदी’भाषा पहिलीपासून अनिवार्यच!

केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय धोरणानुसार तीन भाषा सूत्राचा अवलंब इयत्ता तिसरीपासून करणे आवश्यक असताना राज्य सरकार मात्र हिंदी भाषा पहिलीपासूनच राबवण्याचा आटापिटा करीत आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदीव्यतिरिक्त भाषा शिकायची असल्यास 20 विद्यार्थ्यांचा गट असणे आवश्यक करण्यात आले आहे. हिंदी भाषेसाठी मात्र ही अट नाही. त्यामुळे हिंदीव्यतिरिक्त भाषेला शिक्षक मिळणार नसल्याचेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे सरकार जरी हिंदी सक्ती नसल्याचे सांगत असले तरी सरकारच्या खोटारडेपणामुळे हिंदी पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना शिकावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

नव्या राष्ट्रीय धोरणानुसार राज्य सरकारने 16 एप्रिल 2025 शासन निर्णयानुसार पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा अनिवार्य केली. मात्र या निर्णयाला सर्वच स्तरांतून विरोध झाल्यामुळे 17 जून रोजी शुद्धिपत्रक काढून पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा ‘सर्वसाधारण’ राहणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र हिंदीव्यतिरिक्त तिसरी भाषा शिकायची असल्यास कठोर नियमावली घालण्यात आली. परिणामी विद्यार्थ्यांना आता हिंदी शिकण्यापासून पर्याय राहणार नसल्याचे शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रावरच अन्याय का?

देशातील अन्य कुठल्याही राज्याने पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू केलेले नाही. दक्षिण भारतामध्येही हिंदी भाषा विषयाचा तीन भाषांमध्ये समावेश करण्यात येत नाही. तीन भाषा अध्ययनामुळे अल्पवयीन बालकांवर अभ्यासाचे ओझे वाढणार आहे. त्यामुळे राज्य सरकार महाराष्ट्रावरच अन्याय का करते, असा सवालही आमदार अभ्यंकर यांनी केला आहे.

असे आहे नवे धोरण

नव्या राष्ट्रीय धोरणानुसार तीन भाषा सूत्राची अंमलबजावणी इयत्ता तिसरीपासून करावी. पहिली व दुसरीला एक अभ्यास भाषा व दुसरी तोंडी सराव भाषा असायला हवी. मात्र राज्य शासनाने तीन भाषा लादण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;