दोन-तीन वर्षांचे लोकही आज 59 वर्षांचे झाले आहेत – अंबादास दानवे

दोन-तीन वर्षांचे लोकही आज 59 वर्षांचे झाले आहेत – अंबादास दानवे

वर्धापन दिनानिमित्त मुंबई केवळ ठाकरे यांचीच असे बॅनर्स सभागृहाबाहेर लावण्यात आले आहेत. मात्र हे बॅनर्स साफ चुकीचे आहेत. मुंबई हीच केवळ ठाकरे यांची नाही तर पूर्ण महाराष्ट्र ठाकरे यांचा आहे. आज शिवसेनेच्या या वर्धापनदिनी दोन-तीन वर्षांचे लोकही 59 वर्षांचे झाले आहेत. काही लोक येतात आणि जातात, पण शिवसेनेसारख्या 59 वर्षांच्या संघटनेला हे दोन-तीन वर्षांचे लोक संपवू शकत नाहीत, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाला लगावला. दरम्यान, केवळ आश्वासन देणाऱया महायुती सरकारला जाब विचारणारे ‘क्या हुआ तेरा वादा’ हे मराठवाडय़ापासून सुरू झालेले शेतकऱयांचे आंदोलन आता महाराष्ट्रभरात फैलावणार आहे. युती सरकारने दिलेल्या 25 आश्वासनांपैकी 10 आश्वासने समोर ठेवून सरकारला जाब विचारला जात आहे. यात कर्जमाफी, वीजमाफी असे महत्त्वाचे विषय आहेत. यापुढे आता शेतकऱयांना कर्ज नाकारणाऱया बँकांविरोधात आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱयांना कर्ज मिळाले पाहिजे. शेतकऱयांचा हा लढा राज्यभरात व्यापक झाला पाहिजे, असे दानवे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;