असमानता संपेपर्यंत कोणताही देश लोकशाहीवादी नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत

असमानता संपेपर्यंत कोणताही देश लोकशाहीवादी नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत

समाजातील मोठय़ा घटकांना दुर्लक्षित करणारी असमानता संपेपर्यंत कोणताही देश स्वतःला खऱया अर्थाने लोकशाहीवादी व प्रगतीशील म्हणू शकत नाही, असे परखड मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.

इटली येथील एका कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई म्हणाले, सामाजिक व आर्थिक न्याय हा काल्पनिक आदर्श नाही. समाजात स्थिरता, सुसंवाद व शाश्वत विकासासाठी ती एक गरज आहे; मात्र प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची, त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्याची, तसेच त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनात बरोबरीने सहभाग देण्यातच खरी समानता आहे.

देशातील सामाजिक-आर्थिक न्यायात संविधानाची भूमिका या विषयावर इटलीतील मिलाप येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सरन्यायाधीश गवई यांनी मार्गदर्शन केले.

संविधान आशेचा किरण

हिंदुस्थानचे संविधान हे केवळ राजकीय दस्तऐवज नाही, तर स्वातंत्र्योत्तर गरिबी, असमानता व भेदभाव दूर करण्याच्या हेतूने तयार केलेले क्रांतिकारी वचन व आशेचा किरण आहे. मी स्वतः एका वंचित समुदायातून आलोय. आज मी हिंदुस्थानचा सरन्यायाधीश आहे. हे संविधानामुळेच शक्य झाले आहे, असेही सरन्यायाधीश गवई यांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;