Axiom Mission 4 – शुभांशू शुक्लाची अंतराळ मोहीम पुन्हा पुढे ढकलली; लवकरच पुढील तारीख जाहीर होणार

Axiom Mission 4 – शुभांशू शुक्लाची अंतराळ मोहीम पुन्हा पुढे ढकलली; लवकरच पुढील तारीख जाहीर होणार

अ‍ॅक्सिओम मिशन 4 च्या बहुप्रतिक्षित प्रक्षेपणासाठी जोरदार सराव सुरू आहे. या मोहिमेद्वारे हिदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात जाणार आहे. ही मोहीम रविवारी 22 जून रोजी नियोजित होती. मात्र, आता ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. याआधीही ही मोहिम तांत्रिक त्रुटीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्ही ही पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

अलिकडच्या दुरुस्तीच्या कामानंतर अंतराळ संस्था आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कामकाजाचे मूल्यांकन करत असल्याने मोहिम पुढे ढकलण्यात आली आहे. आता सातव्यांदा ही मोहिम पुढे ढकलली आहे. पेगी व्हिटसन अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेचे नेतृत्व करतील, तर शुभांशू शुक्ल पायलट म्हणून काम करतील. अ‍ॅक्सिओम मिशन 4 च्या प्रक्षेपण तयारीचा आढाव घेण्यात येत आहे. नासाकडून रविवारी 22 जून रोजी होणारे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत प्रक्षेपणाची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाने एका निवेदनात म्हटले आहे.

सद्यस्थितीत 30 जूनपर्यंत उड्डाणाची वेळ आहे. मात्र, काही कारणास्तव ही मुदत हुकली तर, जुलैच्या मध्यात आणखी एक संधी उपलब्ध होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अ‍ॅक्सिओम मिशन 4 हे स्पेसएक्स आणि नासा यांच्या भागीदारीत अ‍ॅक्सिओम स्पेसद्वारे चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी नियोजित खाजगी अंतराळ उड्डाण आहे. नासाचे माजी अंतराळवीर आणि अ‍ॅक्सिओम स्पेसमधील मानवी अंतराळ उड्डाण संचालक पेगी व्हिटसन या मोहिमेचे नेतृत्व करतील. इस्रोचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला पायलट म्हणून काम करतील. 1984 मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांनी इतिहास रचल्यानंतर जवळजवळ चार दशकांनी अंतराळात जाणारे दुसरे भारतीय बनतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पित्ताचे दगड म्हणजे काय? ‘या’ 4 सवयी तुमच्या पित्ताशयातील दगडांना कारणीभूत, जाणून घ्या पित्ताचे दगड म्हणजे काय? ‘या’ 4 सवयी तुमच्या पित्ताशयातील दगडांना कारणीभूत, जाणून घ्या
आता पोट फुगणे, मळमळणे आणि पोटाच्या वरच्या भागात दुखणे यासारख्या समस्या आता 40 किंवा 50 वर्ष वयोगटातील लोकांपुरत्या मर्यादित राहिलेल्या...
कशी वाढवायची उंची? आहार, व्यायाम आणि झोपेच्या ‘या’ टिप्स करतील कमाल
पावसाळ्यात चुकूनही या डाळी खाऊ नका, नाहीतर पोटाच्या आजारांची समस्या वाढेल!
हृदयविकारापासून दूर राहण्यासाठी ‘या’ ट्रिक्स जाणून घ्या
रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ‘अ‍ॅरोहेड’चा मृत्यू; मेंदूच्या ट्युमरमुळे वयाच्या 11 व्या वर्षी निधन
IND vs ENG 1st Test – साई सुदर्शनचं पदार्पण; कोहली, द्रविड, गांगुलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री!
Air India ला अहमदाबादमधील विमान अपघाताचा मोठा फटका, बुकिंगमध्ये 30 ते 35 टक्के घट