शिवसेना वर्धापनदिनी सामाजिक उपक्रमांचा वसा!

शिवसेना वर्धापनदिनी सामाजिक उपक्रमांचा वसा!

शिवसेनेच्या 59व्या वर्धापनदिनी राज्यभरात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गरजूंना मदत, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंतांचा सत्कार, कर्तबगार महिला-पुरुषांचा सत्कार अशा अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शिवसेना शाखा क्रमांक 206च्या वतीने माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या सहकार्याने शिवडी काळाचौकी प्रभाग क्रमांक 206मधील कर्तबगार महिलांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. या वेळी महिला उपविभाग संघटिका श्वेता राणे, शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, महिला शाखा संघटक शुभदा पाटील तसेच शाखेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना परळ शाखा क्र. 203च्या वतीने विभागातील फेरीवाल्यांना छत्रीवाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार अजय चौधरी, उपविभागप्रमुख पराग चव्हाण, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, दिव्या बडवे, भारत म्हाडगुत, मुकेश कोळी, रमेश सावंत, प्रभाकर मोरजकर, सूर्यकांत शिंदे, प्रथमेश जगताप, सुधाकर कदम, सुरेश चाचे, शांताराम चव्हाण, सुरेश बावकर आदी उपस्थित होते.

विलेपार्ले पूर्व शिवसेना शाखा क्र 84 च्या वतीने शिवसैनिक, विभागातील नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख प्रकाश कृष्णा सकपाळ यांनी केले. यावेळी विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;