अमित शहा म्हणतात देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःचीच लाज वाटेल

अमित शहा म्हणतात देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःचीच लाज वाटेल

भारतीय भाषा ही आपली ओळख आहे. त्याचा अभिमान बाळगा. देशात इंग्रजीतून संवाद साधणाऱयांना स्वतःचीच लाज वाटेल असा समाज लवकरच तयार होईल. ही लढाई कठीण आहे, पण भारतीय समाज ती जिंकेल आणि पुन्हा एकदा स्वाभिमानाने आपला देश आपल्याच भाषांमध्ये चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांच्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शहा बोलत होते.

प्रशासनात सहानुभूतीची गरज

– आजही ब्रिटिशकालीन मानसिकतेतून तयार झालेली व्यवस्था सहानुभूतीचा अभाव बाळगते. प्रशासक जर सहानुभूतीशिवाय निर्णय घेत असेल तर तो प्रशासनाचा खरा उद्देश साध्य करू शकत नाही.

– जेव्हा देश अंधारात होता तेव्हा साहित्याने धर्म, स्वातंत्र्य आणि संस्कृतीची ज्योत तेवत ठेवली. सत्तांमध्ये बदल झाले, पण जेव्हा जेव्हा साहित्याला दडपण्याचा प्रयत्न झाला तेव्हा समाजाने संघर्ष केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;