समृद्धी मार्ग गुरुवारपासून पूर्ण खुला; मोदींसाठी दोन महिने थांबले, आता मोदींशिवाय लोकार्पण

समृद्धी मार्ग गुरुवारपासून पूर्ण खुला; मोदींसाठी दोन महिने थांबले, आता मोदींशिवाय लोकार्पण

मुंबई आणि नागपूर शहरांना जोडणाऱया हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा अखेर गुरुवार, 5 जूनला वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. इगतपुरी ते आमणे या 76 किमीच्या टप्प्याचे काम दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने आता मुख्यमंत्रीच हे लोकार्पण करणार आहेत. लोकार्पण लांबल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वळसा घालत वाहतूक काेंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.

इगतपुरी ते आमणे या 76 किमीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. इगतपुरी येथे हा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. त्याच दिवशी हा अंतिम टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. शेवटच्या टप्प्याचे काम मार्च अखेरीसच पूर्ण झाले होते. त्यानंतर महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी वाहनचालकांची अपेक्षा होती. मात्र सरकार पातळीवर दिरंगाई केल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाने वळसा घालण्याबरोबरच वाहतूक काेंडीचा मनस्ताप दरदिवशी सहन करावा लागत होता. या काेंडीतून आता सुटका होणार आहे.

मुंबईहून नागपूरला 8 तासांत पोचणार

समृद्धी महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने मुंबईहून नागपूरला कमी वेळेत पोहोचता येणार आहे. या दोन शहरांतील प्रवासासाठी पूर्वी 16 तास लागायचे. हा प्रवास आता 8 तासांत पूर्ण करता येणार आहे. 701 किमीच्या समृद्धी महामार्गामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पंतप्रधान मोदी मे महिन्यात मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुल येथे वेव्ह्स समिटसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करण्याचा महायुती सरकारचा ‘प्लान’ होता. मात्र पंतप्रधान मोदी वांद्रेतील समिटमधूनच दिल्लीला माघारी गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डीदरम्यान 520 किमी मार्गाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर 23 मे 2023 रोजी शिर्डी ते भरवीर हा 105 किमीचा आणि 4 मार्च 2024 रोजी भरवीर ते इगतपुरी हा मार्ग खुला करण्यात आला. मात्र इगतपुरी ते आमणे हा टप्पा खुला करण्यात दिरंगाई झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;