‘हाऊसफुल 5’ च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये धक्काबुक्की, अक्षय कुमारने चाहत्यांसमोर जोडले हात

‘हाऊसफुल 5’ च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये धक्काबुक्की, अक्षय कुमारने चाहत्यांसमोर जोडले हात

पुण्यातील एका मॉलमध्ये ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाचा प्रमोशनल इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या वेळी चित्रपटाची स्टारकास्ट अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, नाना पाटेकर, नर्गिस फाखरी आणि इतर अनेक कलाकार उपस्थित होते. सेलिब्रिटींना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. अगदी धक्काबुक्की झाली. धक्काबुक्की नियंत्रित करण्यासाठी अक्षय कुमारने प्रेक्षकांसमोर हात जोडले.

प्रमोशनल इव्हेंटचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांनी स्टेजच्या जवळ जाण्यासाठी तुफान गर्दी केली. गर्दीत मुले, महिला आणि वृद्ध चेंगरले जाऊ लागले. या घटनेच्या एका व्हिडीओमध्ये मुले बॅरिकेड्सच्या मागे अडकल्यानंतर वेदनेने ओरडताना दिसत आहेत. तसेच एक मुलगा सुरक्षापथकाला सांगत आहे की, त्याच्या काकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि तो गर्दीत अडकला आहे. ही बिकट परिस्थिती पाहता अक्षय माइक हातात घेऊन म्हणाला की, इथून बाहेर पडा. ढकलू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, इथे महिला आणि मुले आहेत. बऱ्याच संघर्षानंतर सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर चित्रपटाच्या स्टारकास्टने स्टेजवर धमाल केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;