भाजप आणि महाराष्ट्राचा नकली चाणक्य यांची लेवल जनतेला समजली, संजय राऊत यांचा सणसणीत टोला
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा झाला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले. छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान या शपथविधीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजपला सणसणील टोला लगावला आहे.
श्रीछगन भुजबळ फडणवीस यांच्या मंत्री मंडळात सन्मानीय मंत्री झाले याचा मला मनस्वी आनंद होतो आहे.
या मुळे संपूर्ण भाजपा,महाराष्ट्राचा नकली चाणक्य यांची “लेवल जनतेला समजली.
मुलुंड चा नागडा पोपटलाल तर बेवा झाला!
ढोंगी आणि बकवास लेकाचे!
@Dev_Fadnavis
@narendramodi pic.twitter.com/vIw17JHuuJ— Sanjay Raut (@rautsanjay61) May 20, 2025
त्याविषयी संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. ”श्री छगन भुजबळ फडणवीस यांच्या मंत्री मंडळात सन्मानीय मंत्री झाले याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. या मुळे संपूर्ण भाजपा,महाराष्ट्राचा नकली चाणक्य यांची “लेवल जनतेला समजली. मुलुंड चा नागडा पोपटलाल तर बेवा झाला. ढोंगी आणि बकवास लेकाचे”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
आजवर ज्या छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच छगन भुजबळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. छगन भुजबळांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते असतानाही सुरुवातीला छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली होती. मात्र, आता मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List