ही सत्तेची मुजोरी कुणा मुळे? बबनराव लोणीकरांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

ही सत्तेची मुजोरी कुणा मुळे? बबनराव लोणीकरांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच असे वादग्रस्त विधान भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केले होते. ही सत्तेची मुजोरी कुणा मुळे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, हा हे खरंय…. फक्त हेच नाही. युद्ध तुम्हीच थांबवता…2014 नंतर भारत तुमच्यामुळेच स्वतंत्र झाला.. जी काही प्रगती झाली तुमच्यामुळेच झाली… झाडं फळं तुमच्यामुळेच देतात.. नद्या तुमच्यामुळेच वाहतात… लोकं सकाळी उठून कामाला तुमच्यामुळेच जातात… एवढंच कशाला…
सूर्य तुमच्यामुळेच उगवतो… बस का अजून काही बाकी आहे… कसं आहे माहितेय का भरलेल्या गाडीच्या मागं पुढे पळून एखाद्याला वाटतं त्याच्यामुळेच गाडी ओढली जाते… असतो एखाद्याचा गैरसमज चालायचंच
ही सत्तेची मुजोरी कुणा मुळे? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;