ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचा धोका वाढला! आजार नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी आवश्यक

ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचा धोका वाढला! आजार नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी आवश्यक

एकलकोंडेपणा, मोबाईल, टीव्हीसारख्या माध्यमांवर तासन्तास वेळ घालणे, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे सध्या ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘डिमेन्शिया’ आजाराचा धोका वाढत आहे.

पूर्वी 60 ते 65 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आजार दिसून येत होता; मात्र अलीकडे ५० वर्षांच्या ज्येष्ठांमध्ये हा आजार उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्येष्ठांमधील हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

डिमेन्शिया हा प्रामुख्याने उतारवयात आढळून येणारा आजार आहे. पूर्वी साठी नंतरच्या ज्येष्ठांमध्ये काही प्रमाणात हा आजार आढळून येत होता. मात्र, सध्या पन्नाशीतल्या ज्येष्ठांमध्ये हा आजार बळावण्याचे प्रमाण वाढले आहे. लक्षणे दिसून आल्यास मेंदूचा एमआरआय, सीटी स्कॅन करणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप याचा अवलंब केल्यास नियंत्रण मिळवता येते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

“ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचे प्रमाण वाढले आहे. एकलकोंडेपणा, ताणतणाव, व्यायाम, सकस आहाराचा अभाव यासारख्या गोष्टी या आजाराला कारणीभूत ठरत आहेत. हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.”

– डॉ. राजेश अलोणे, मानसोपचार तज्ज्ञ

डिमेन्शियाची लक्षणे

– विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे.
– भाषा आणि संवाद साधण्यात अडचणी येणे.
– वर्तणुकीत बदल होणे.
– नैराश्य, चिडचिड वाढणे.

या गोष्टींचा अवलंब करावा

– नियमित व्यायाम.
– संतुलित आहार.
– सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणे.
– नवीन गोष्टी शिकणे.
– ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;