रोज सुका मेवा खाणे गरजेचे आहे का? वाचा

रोज सुका मेवा खाणे गरजेचे आहे का? वाचा

आपल्या आरोग्यासाठी प्रथिनांचे महत्त्व खूप अबाधित आहे. प्रथिने ही आपल्या शरीराच्या वाढीसाठी फार महत्त्वाची मानली जातात. म्हणूनच आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा समावेश हा खूप गरजेचा आहे. म्हणूनच रोज किमान काही प्रमाणात सुका मेवा खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. सुक्या मेव्यामधून आपल्याला प्रथिनांचा मुबलक साठा मिळतो. मुख्य म्हणजे म्हणूनच आरोग्याविषयी जागरूक असणारे, ड्राय फ्रूट हे नाश्त्यामध्ये खातात. ड्रायफ्रूट बद्दल आज अनेक समज गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात. काहीजण म्हणतात की, रोज ड्रायफ्रूटचे सेवन करणे हे वाईट असते. परंतु तज्ज्ञ मात्र म्हणतात, योग्य प्रमाणात ड्रायफ्रूट खाणे हे केव्हाही उत्तम.

ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी आपल्या आहारात सुका मेवा असणे हे खूप गरजेचे आहे.

कोणत्याही पद्धतीने आपण गोड पदार्थांचा आहारात समावेश करण्यापेक्षा, सुका मेवा खाणे उत्तम असा सल्ला वैद्यकिय तज्ज्ञही देतात.

 

शरीर निरोगी आणि बलवान होण्यासाठी सुका मेवा हा आहारात असायलाच हवा.

सुकामेवा खाल्यामुळे आपली पचनशक्ती चांगली सुधारते. अन्न पचन होण्यासाठी सुका मेवा म्हणूनच रोज योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे.

हाडांच्या आरोग्यासाठी सुका मेवा खाणे हे खूप गरजेचे आहे. तसेच खासकरुन महिलांनी चाळीशीनंतर आहारात न विसरता सुक्या मेव्याचा समावेश करायला हवा.

सुका मेवा हा मेंदूच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असल्यामुळे, सुका मेवा ब्रेन फूड म्हणूनही ओळखले जाते.

 

रोज योग्य प्रमाणात बदाम, पिस्ता, अक्रोड खाण्यामुळे हृद्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

त्वचेचे आरोग्यही सुका मेवा खाल्ल्यामुळे खूप सुधारते. त्वचेला आवश्यक पोषण तत्व ही सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;