शिवबंधन परिक्रमेतून कोकणात भगवे वादळ निर्माण करणार, उपनेते बाळ माने यांनी मोर्चेबांधणीला केली सुरुवात

शिवबंधन परिक्रमेतून कोकणात भगवे वादळ निर्माण करणार, उपनेते बाळ माने यांनी मोर्चेबांधणीला केली सुरुवात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर माजी आमदार बाळ माने संपूर्ण कोकणात शिवबंधन परिक्रमा करणार आहेत. याशिवबंधन परिक्रमेच्या माध्यमातून कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण करण्याचा निश्चय त्यांनी केला असून आज चिपळूणात श्रीदेव परशुराम मंदिरात अभिषेक करून शिवबंधन परिक्रमेसाठी आशीर्वाद घेतले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उपनेते बाळ माने कोकणात शिवबंधन परिक्रमा मोहिम राबणार आहेत.आज राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीपासून त्यांनी कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये शिवबंधन परिक्रमेचे नियोजन सुरू करत पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी बाळ माने संवाद साधत आहेत. पाच जिल्ह्यातील 9 महानगरपालिका, 5 जिल्हा परिषद,सर्व नगरपरिषद, नगरपंचायत आणि पंचायत समिती स्तरावरील पदाधिकऱ्यांशी बाळ माने यांनी संवाद साधयला आजपासून प्रारंभ केला.

शिवबंधन परिक्रमा ही 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सुरू होणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ.रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. शिवबंधन परिक्रमेचा समारोप सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर 24 ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी माहिती उपनेते बाळ माने यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;