मोठ्या आवाजात गाणी लावल्याने आई ओरडली, अल्पवयीन मुलाने घेतला आईचा जीव

मोठ्या आवाजात गाणी लावल्याने आई ओरडली, अल्पवयीन मुलाने घेतला आईचा जीव

एका 17 वर्षाच्या मुलाने घरात मोठ्या आवाजात गाणी लावली होती. मुलाची आई त्याला ओरडली तर त्या मुलाने आपल्या आईचा गळा दाबून खून केला आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक मुलगा बारावीत शिकत होता. वडील घरी नसताना आई आजारी असल्यामुळे मोठा मुलगा घरीच होता. घरकाम करत असताना त्याने मोठ्या आवाजात गाणी लावली होती. आजारी असल्यामुळे आईने आवाज कमी करायला सांगितले, पण त्याने आपल्याला ऐकू येत नसल्याचे सांगितले. त्यावर आई चिडली आणि तिने मुलाच्या कानाखाली मारली आणि स्पीकर फोडून टाकला. त्यावरून मुलाचा संताप अनावर झाला आणि त्याने आईला ढकलून दिले. त्यात आई खाली पडली आणि गंभीर जखमी झाली. त्यानंतर मुलाने आपल्या आईचा गळा दाबून खून केला. यानंतर मुलाने आपल्या आईचा मृतदेह पलंगाखाली लपण्याचा प्रयत्न केला.

आई बेपत्ता असल्याचे लहान भावाने शेजाऱ्यांना सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली. आईला शोधतानापलंगाखालून अर्धवट बाहेर आलेली ओढणी दिसली. तेव्हा आईचा मृतदेह आढळला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;