गायिकेचा मोबाईल हिसकावून चोरट्याने काढला पळ

रिक्षाने प्रवास करत असणाऱया गायिकेचा चोरटय़ाने धूम स्टाईलने मोबाईल चोरून पळ काढल्याची घटना घडली. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या गायिका असून त्या जोगेश्वरी परिसरात राहतात. मंगळवारी रात्री त्या मैत्रिणीला भेटण्यासाठी वर्सोवा येथे गेल्या होत्या. तेथे मैत्रिणीची भेट घेतल्यानंतर त्या रात्री रिक्षाने घरी जात होत्या. रिक्षाने प्रवास करताना त्यांच्या हातात पह्न होता. मिल्लत नगर येथून जात असताना मोटरसायकलवरून दोन जण आले. धूम स्टाईनने मोटारसायकल चालवत होते. चोरटय़ाने महिलेच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला. या प्रकरणी तिने ओशिवरा ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;