Hair Care – केस धुतल्यानंतर ‘ही’ चूक पडू शकते महागात, वाचा

Hair Care – केस धुतल्यानंतर ‘ही’ चूक पडू शकते महागात, वाचा

आपण आठवड्यातून किमान एक किंवा दोन वेळा केस धुतो. केस धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी अनेकजण हेअर ड्रायरचा वापर करतात. परंतु हेअर ड्रायरचा अतिवापर हा केसांसाठी खूप हानिकारक मानला जातो. हेअरड्रायरच्या वापरामुळे केस गळण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच सतत हेअर ड्रायरचा वापर केल्यामुळे, केसांचा पोतही बिघडतो.

केस धुतल्यावर सुकवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे नैसर्गिकरीत्या मिळणारे ऊन. पण प्रत्येकवेळी आपल्याला ऊन मिळेलच असे नाही, अशावेळी आपण केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करतो. तुम्ही हेअर ड्रायर नियमितपणे वापरत असाल तर तुम्हाला त्याचे तोटे आणि खबरदारी जाणून घेणे आवश्यक आहे.

Hair Care – पावसाळ्यातील केसगळतीवर फक्त 7 रुपये होईल खर्च, वाचा सविस्तर

केसांना नवीन हेअरस्टाइल देण्यासाठी हेअर ड्रायरचाही वापर केला जातो. पण त्याचे तोटेही लवकरच दिसू शकतात. हेअर ड्रायरच्या अतिवापराने केसांचे नैसर्गिक सौंदर्य हिरावून घेतले जाऊ शकते.

हेअरड्रायरच्या रोजच्या वापरामुळे केसांमध्ये कोंडा, क्लेमेंट, निस्तेज आणि कोरडेपणा यासारख्या समस्या वाढू शकतात आणि केस कोरडे आणि निर्जीव होऊन तुटायला लागतात. हेअर ड्रायर मुळे केसांच्या मुळांना इजा होते, तसेच डबल केस फुटण्यास सुरुवात होते.

हेअर ड्रायरच्या अतिरिक्त वापरामुळे अनेकांमध्ये केस सफेद होण्याचे प्रमाणही खूप वाढलेले आहे. अतिरिक्त वापरामुळे केसांखालील त्वचा कोरडी होते त्यामुळे केस तुटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणूनच हेअर ड्रायरचा वापर हा डोळसपणे करायला हवा. उगाच अतिरिक्त वापर करून केसांना हानी पोहचण्यापेक्षा थोडा डोळसपणे हेअर ड्रायरचा वापर करा.

 

हेअर ड्रायर वापरताना लक्षात ठेवा की, केसांपासून त्याचे अंतर 6-9 इंच असावे. अन्यथा, केसांमधील कोरडेपणा वाढेल आणि ते लवकर तुटण्यास सुरवात होतील.

हेअर ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना सिरम लावा, जेणेकरून ड्रायरच्या उष्णतेमुळे केसांचे जास्त नुकसान होणार नाही आणि केस मऊ होऊ शकतात.

तुमच्या केसांच्या प्रकारानुसार हेअर ड्रायर वापरणे चांगले. केस कुरळे, कोरडे, मऊ किंवा रेशमी आहेत की नाही यावर अवलंबून, आपल्याला तापमान किती लागेल हे लक्षात घ्यायला हवे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आवडीने नारळपाणी पिताय? थांबा, शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान! आवडीने नारळपाणी पिताय? थांबा, शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान!
आजारी असल्यानंतर नारळाचं पाणी आवर्जुन पिलं जातं. नारळात असलेलं पाणी फार पौष्टीक असल्याचेही सांगितले जाते. मात्र हेच नारळाचे पाणी तुम्हाच्या...
पंतप्रधानांनी कितीही अघोरी कृत्य केली तरी या देशाच्या लोकशाहीची हत्या करता येणार नाही; संजय राऊत यांचा घणाघात
मॅट्रिमोनी साईटद्वारे महिलेची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक, पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
संविधान की संसद, कोण सर्वोच्च? सरन्यायाधीश गवई यांनी सांगितलं…
ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर चेंगराचेंगरी, 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू; 260 हून अधिक जखमी
Katha Vachak Case – यूपीत इटावामध्ये जमावाने केली दगडफेक, पोलिसांचा हवेत गोळीबार; नेमकं काय घडलं? वाचा…
1 महिने सकाळी मलासन पोझमध्ये बसून प्या गरम पाणी, पाहा रिझल्ट, Yoga एक्सपर्टचा सल्ला