पत्नी कमावती असली तरी तिला पोटगीचा हक्क; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

पत्नी कमावती असली तरी तिला पोटगीचा हक्क; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

पोटगीच्या हक्काबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. पत्नी कमावती असली तरी तिला पोटगीचा हक्क असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. केवळ पत्नी कमावते आहे म्हणून तिला विभक्त पतीकडून आर्थिक मदतीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. विवाहितेला दरमहा 15 हजार रुपयांची पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने कायम ठेवला.

पतीसोबत असताना ज्या पद्धतीचे राहणीमान होते, त्याच पद्धतीचे राहणीमान विभक्त झाल्यानंतरही राखण्याचा पत्नीला अधिकार असल्याचे न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी स्पष्ट केले. विभक्त पत्नीला दरमहा 15 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश कुटुंब न्यायालयाने ऑगस्ट 2023 मध्ये दिला होता. कुटुंब न्यायालयाच्या या आदेशाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

पत्नी दरमहा 25 हजार रुपयांपेक्षा जास्त कमावते. त्यामुळे तिला जास्त पोटगी देण्याची आवश्यकता नाही, असा युक्तीवाद पतीच्या वतीने वकिलांनी केला. तसेच मी दरमहा 57 हजार रुपये कमवतो. मात्र आजारी पालकांची काळजी घेण्यासह माझा वैयक्तीक खर्च 54 हजार रुपये आहे. यामुळे पत्नीला दरमहा 15 हजार रुपये देण्यास असमर्थ असल्याचे पतीने न्यायालयासमोर म्हटले.

तथापि, पतीचा हा दावा पत्नीने खोटा ठरवला. पती एका नामांकीत कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असून तो दरमहा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतो. तसेच त्याचे वडील महापालिका शाळेतून निवृत्त झाले असून त्यांना पेन्शन म्हणून 28 हजार रुपये मिळत आहे, याकडे महिलेने लक्ष वेधले.

महिलेचा युक्तीवाद न्यायालयाने गांभीर्याने विचारात घेतला. पत्नी कमावती असली तरी नोकरीसाठी तिला लांबचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तिचे उत्पन्न तिच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे नाही. एवढ्या कमी उत्पन्नात ती चांगले जीवन जगू शकत नाही. पत्नी कमावती आहे म्हणून तिला विभक्त पतीपासून आर्थिक मदतीपासून वंचित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद करत न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी पतीची याचिका फेटाळून लावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;