पावसाळ्यात दही नीट लागत नाही, फक्त एक चमचा हा पदार्थ घाला, बर्फीप्रमाणे दह्याचे काप पडतील

पावसाळ्यात दही नीट लागत नाही, फक्त एक चमचा हा पदार्थ घाला, बर्फीप्रमाणे दह्याचे काप पडतील

पावसाळ्या कुठलेही आंबवण्याचे पदार्थ किंवा दही म्हणा हे नीट सेट होत नाही. दही लावण्यासाठी उन्हाचा कालावधी हा खूप चांगला मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दही लावण्यासाठी कुठलीही मेहनत घ्यावी लागत नाही. परंतु पावसाळ्यात मात्र दही लावताना फार डोकेदुखी होते. पावसाळ्यात दही नीट लागत नसल्यामुळे, ते पाण्यासारखे वाहते. पाणीदार दही खायलाही मजा येत नाही. म्हणूनच पावसाळ्यात दही लावताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर दही सर्वात उत्तम लागु शकते. शिवाय हे घट्ट आणि दाटसर दही खाण्याची मजा ही काही औरच असते.

दही उत्तम लागण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

गोड आणि घट्ट दही लागण्यासाठी तापमान किमान 40 ते 42 अंश इतके असायला हवे.

दह्याला गोडवा येण्यासाठी, दही लावताना दूधाच्या तापमानाचाही अंदाज घेणे गरजेचे आहे. ज्या दुधामध्ये तुम्हाला गरम केल्यानंतर, सहज बोट घालता येईल असे दही लावण्यासाठी सर्वात उत्तम. म्हणजेच जर ते कोमटपेक्षा थोडे जास्त गरम दूध असल्यास ते सर्वात उत्तम.

दही लावण्यासाठी तापमानाचं गणित व्यवस्थित लक्षात ठेवायला हवं. विरजण घालताना दूध खूप गरम असल्यास, विरजणातील बॅक्टेरिया मरतील. विरजणातील बॅक्टेरिया मेले तर, दही आंबट होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

 

दही लावताना मूळात विरजण आंबट नसावे. विरजण आंबट असेल तर दही पातळ होते.

 

दुधामध्ये विरजण घातल्यानंतर, किमान चार ते पाच ते मिश्रण अजिबात ढवळू नये. असे केल्यास दही पाण्यासारखे पातळ होते.

Curd Rice Benefits- जेवणाची सांगता करताना दही भात खाणे का महत्त्वाचे आहे? वाचा यामागची आर्युर्वेदीय कारणे

दही विरजण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर करणे सर्वात उत्तम मानले जाते. मातीच्या भांड्यामध्ये दही उत्तम लागते.

विरजण लावताना फुल क्रीम दुधाचा वापर करावा. त्यामुळे दह्याची गुणवत्ता सुधारते तसेच दही उत्तम प्रतीचे लागते.

मिठाईच्या दुकानातील दही एकदम वडीप्रमाणे पडते. अशापद्धतीचे दही हवे असल्यास, दुधात किमान एक किंवा दोन चमचे मिल्क पावडर घालावी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल