Fact Check – आता दुचाकी वाहनांनाही टोल द्यावा लागणार का?

Fact Check – आता दुचाकी वाहनांनाही टोल द्यावा लागणार का?

देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून आता दुचाकीने टोल फ्री प्रवास करता येणार नाही. 15 जुलै, 2025 पासून देशभरातील दुचाकी वाहनधारकांकडूनही टोल वसूल करण्याची सरकारी योजना असल्याच्या बातम्या गुरुवारी सकाळी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या. यामुळे एकच खळबळ उडाली.

अर्थात यासंदर्भात केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केली नव्हती, मात्र विविध माध्यमांनी दिलेल्या अशा प्रकारच्या बातम्यामुळे दुचाकी वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र आम्ही याबाबत अधिक पडताळणी केली असता असा कोणताही आदेश सरकारकडून देण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले. आता याच बाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विट करत माहिती दिली आहे.

तीन हजार रुपयांमध्ये वर्षभराचा फास्टॅग पास, खासगी वाहने टोलनाक्यांवर 200 वेळा करू शकणार प्रवास

नितीन गडकरी यांनी गुरुवारी दुपारी आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “काही माध्यमे दुचाकी वाहनांवर टोल लावण्याबाबत दिशाभूल करणारे वृत्त पसरवत आहेत. दुचाकी वाहनांना टोल लावण्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलमधून पूर्णपणे सूट असणार आहे. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे निरोगी पत्रकारितेचे लक्षण नाही. मी याचा निषेध करतो”, असे गडकरी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांनाही टोल लावला जाणार असल्याच्या बातम्या या फक्त अफवा असल्याचे स्पष्ट होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;