टीम इंडियाचा संक्रमण काळ सुरू, थोडा वेळ द्या! किरण मोरे यांनी केली ‘गिल’सेनेची पाठराखण

टीम इंडियाचा संक्रमण काळ सुरू, थोडा वेळ द्या! किरण मोरे यांनी केली ‘गिल’सेनेची पाठराखण

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या हिंदुस्थानच्या संघाला लीड्स कसोटीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. हिंदुस्थानच्या पाच फलंदाजांनी या कसोटीत शतक ठोकले होते. मात्र तरीही स्वैर गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण यामुळे पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव क्रीडा चाहत्यांच्या जिव्हारी लागला. मात्र हिंदुस्थानचे माजी खेळाडू किरण मोरे यांनी शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या नवख्या संघाची पाठराखण केली आहे. हिंदुस्थानच्या संघाचा संक्रमण काळ सुरू असून त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल, असे ते म्हणाले. मात्र झेल सोडल्यास कसोटी जिंकणे अवघड असल्याचे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी ब्रँड असलेल्या ‘स्ट्रेटबॅट’च्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आपण झेल सोडले हे मान्य, मात्र आपण चांगले क्रिकेटही खेळलो. पहिल्या डावात 400 वर धावा आणि दुसऱ्या डावात साडे तीनशे धावा केल्या. 371 धावांचा पाठलाग करणे सोपे नव्हते. इथे इंग्लंडला नक्कीच श्रेय द्यावे लागेल. त्यांनी खेळावर वर्चस्व मिळवले. मात्र आपण हिंदुस्थानच्या संघालाही थोडा वेळ द्यायला पाहिजे. हिंदुस्थानच्या क्रिकेटमध्ये हा परिवर्तनाचा काळ असून संघाची बांधणी होण्यास थोडा वेळ लागेल, असे ते म्हणाले.

शुभमन गिल याची कर्णधार म्हणून ही पहिलीच कसोटी होती. या कसोटीत त्याने शतक झळकावले. यशस्वी जैस्वालनेही शतक ठोकले. पण आपल्याकडून काही झेल नक्कीच सुटले. क्रिकेटमध्ये झेल सुटतात, हा खेळाचाच भाग आहे. इंग्लंडसारख्या थंड हवामान असलेल्या देशात स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करणे सोपे नाही. अनेकदा चेंडू हवेत फिरतो. त्यामुळे आपल्याला संघाला वेळ द्यावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाचे 20 विकेट घेणारे गोलंदाजही शोधावे लागतील. फिरकीपटू, वेगवान गोलंदाज शोधावे लागतील. जडेजा आणि अश्विन या जोडीने हे काम अनेक वर्ष केले. पण त्यांची जागा घेऊ शकेल असे खेळाडू शोधून त्यांना पैलू पाडावे लागतील. ही एक प्रोसेस असून त्यातूनच चांगली टीम बनले, असा विश्वास किरण मोरे यांनी व्यक्त केला.

लीड्स कसोटीत हिंदुस्थानच्या तळाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. यावरही किरण मोरे यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केले. पंतनंतर धावा झाल्या नाहीत हे खरे आहे. तळाच्या फलंदाजांनी 30-40 धावा केल्या किंवा कुणाला तरी साथ देऊन तशी भागिदारी केली तरी खूप फरक पडतो. पण संघ एका रात्रीत तयार होत नाही. यासाठी देशांतर्गत क्रिकेटमधून खेळाडू शोधावे लागतील. संघ बनताना वेळ लागतो, या दरम्यान काही सामने हरूही, असेही ते म्हणाले.

झेल सोडले अन् सामनाही निसटला! शुभमन गिलने क्षेत्ररक्षकांवर फोडले पराभवाचे खापर

आपल्याकडे वेगवान गोलंदाज आहेत. पण फिरकीवर काम करावे लागेल. जडेजा चांगला फिरकीपटू आहे, तो अनेक वर्षांपासून चांगली कामगिरी करतो. पण तो निवृत्त झाल्यानंतर कोण? असा सवाल किरण मोरे यांनी उपस्थित केला. कुलदीप यादव, अक्षर पटेल असे पर्याय आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही शोध घ्यावा लागेल. आपल्याकडे बुमराहसारख्या मुख्य गोलंदाज आहे. कोणत्याही खेळपट्टीवर तो विकेट काढून देतो. त्यामुळे आपण खुप लकी आहेत, असेही ते म्हणाले.

‘स्मार्ट बॅट’चे अनावरण

दरम्यान, स्ट्रेटबॅटने एआयवर आधारित स्मार्ट स्टीकर सादर केले आहे. हे स्टीकर कोणत्याही क्रिकेट बॅटचे रुपांतर परफॉर्मन्स अॅनालिटिक्स साधनात करण्यास सक्षम आहे. स्ट्रेटबॅटचे सीईओ गगन डागा, सहसंस्थापक मधु सूदन यांच्यासह किरण मोरे यांच्या उपस्थितीत हे स्टीकर सादर करण्यात आले.

Ind Vs Eng Test : एजबॅस्टनवर बुमराशिवायच उतरणार

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;