Iran Israel News – बंकरमधूनच खामेनींची विजयाची घोषणा; म्हणाले, युद्धात इस्रायलचा पराभव केला

Iran Israel News – बंकरमधूनच खामेनींची विजयाची घोषणा; म्हणाले, युद्धात इस्रायलचा पराभव केला

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाल्यानंतर इराणचे सुप्रीम नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी पहिल्यांदाच देशातील जनतेला संबोधित केले आहे. आपल्या भाषणात इराणच्या जनतेचे अभिनंदन करत इराणने झिओनिस्ट शत्रूचा नाश केल्याचे म्हटले. खामेनींनी बंकरमधून हा संदेश दिल्याचे म्हटले जात आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षा दलांनी खामेनी यांना तेहरानमधील एका सुरक्षित बंकरमध्ये नेले आहे.

ट्रम्प तोंडावर आपटले! इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला फसला; युरेनियमचा साठा सुरक्षित, पेंटागॉनचा गुप्त अहवाल फुटला!

इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या धमकीवर खामेनी यांनी दोन दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. ज्यांना इराणी लोक आणि त्यांचा इतिहास माहित आहे, त्यांना हे माहिती आहे की इराणी राष्ट्र शरणागती पत्करणारे राष्ट्र नाही, असे खामेनी म्हणाले होते. ते पुढे म्हणाले, या सर्व गोंधळ आणि दाव्यांमुळे इस्लामिक रिपब्लिकच्या प्रहाराखाली झिओनिस्ट राजवट व्यावहारिकरित्या उलथवून लावत चिरडली गेली.

पाकिस्तान बनवतंय थेट अमेरिकेपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र

इस्रायलच्या पराभवाच्या भीतीने अमेरिकेने या युद्धात उडी घेतल्याचा दावा खामेनी यांनी केला आहे. येथेही इस्लामिक रिपब्लिक विजयी झाले आणि अमेरिकेला चपराक दिल्याचे खामेनी म्हणाले.

दरम्यान, इराणला अजूनही आपल्या सैन्य आणि अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्यांची भीती आहे. त्यामुळे इराण रेडी टू अटॅक मोडमध्ये असल्याचा दावा काही वृत्तांमधून करण्यात आला आहे. पुन्हा हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सज्ज आहोत, असे इराणच्या सैन्य अधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;