फक्त एक महिना ‘ही’ भाजी खाल तर वर्षभर निरोगी राहाल, अनेक आजारांवर गुणकारी

फक्त एक महिना ‘ही’ भाजी खाल तर वर्षभर निरोगी राहाल, अनेक आजारांवर गुणकारी

पावसाळा आल्यावर बाजारामध्ये रानभाज्या दिसू लागतात. विक्रेत्यांकडे विविध प्रकारच्या असलेल्या रानभाज्या, या आपल्या आरोग्यासाठी नवसंजीवनी घेऊन येत असतात. पावसाळी रानभाज्या या आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाच्या मानल्या जातात. वर्षातून एकदाच येणाऱ्या या भाज्या आपल्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. अशीच एक पावसाळी रानभाजी म्हणजे कंटोली किंवा करटोली. या भाजीला बघून तुम्ही नाक मुरडत असाल तर, या भाजीचे फायदे जाणून घ्या. कंटोली केवळ नुसती भाजी नाही तर आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. या भाजीचे असंख्य फायदे आपल्या शरीरासाठी होतात. वर्षातून पावसाळ्याच्या सीझनमध्ये येणारी ही भाजी खाल्ल्याने, आपल्या आरोग्यास बहुमोली फायदे होतात.

पावसाळ्यात सामान्य भाज्यांचे भाव गगनाला भिडतात, अशावेळी पावसाळी रानभाज्यांचा समावेश आहारात करायला हवा. उत्तम आरोग्यासाठी हंगामी फळे आणि भाज्या हा एक उत्तम पर्याय आहे. हंगामी फळ भाज्यांमुळे हंगामातील संसर्गजन्य आजार टाळण्यास मदत होते.

वांग्याची भाजी खाल्ल्याने खरोखरच मूतखडा होण्याचा धोका वाढतो का? वाचा सविस्तर

कंटोलीचे इंग्रजी नाव हे मोमोर्डिका डायइका हे आहे. ही भाजी प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ली जाते.

कंटोली खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

कंटोलीचा आहारात समावेश केल्याने, रक्तदाबावर मात करता येते.

हंगामी आजारांवर कंटोली खाणे ही केव्हाही उत्तम मानली जाते. कंटोलीचा आहारात समावेश केल्यामुळे, सामान्य सर्दी आणि इतर विषाणूंना देखील दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी सुद्धा कंटोलीच्या भाजीचा उपयोग हा आहारामध्ये करण्यात येतो.

कंटोलीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे अकाली वृद्धत्वावर मात करण्यासाठी पुरेसे घटक आपल्या शरीराला मिळतात.

कंटोली ही भाजी किडनी स्टोनवर फार प्रभावी मानली जाते. किडनी स्टोन रोखण्यासाठी ही भाजी मदत करते.

महिन्यातून किमान दोनदा कंटोलीचे सेवन केल्याने, आपल्याला त्वचा रोगापासून सुटका मिळते.

परफेक्ट पाणीपुरीचे पाणी आता बनवा घरच्या घरी! या टिप्स वापरा बाजारातील पाणीपुरी होईल फेल

या भाजीमध्ये असे महत्त्वाचे घटक आहेत, ज्यामुळे आपल्या मेंदूचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

पावसाळ्यात दही नीट लागत नाही, फक्त एक चमचा हा पदार्थ घाला, बर्फीप्रमाणे दह्याचे काप पडतील

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;