IMD Alert : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई-ठाणे-पालघरला यलो अलर्ट; कुठे कसा असेल पाऊस? वाचा…

IMD Alert : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई-ठाणे-पालघरला यलो अलर्ट; कुठे कसा असेल पाऊस? वाचा…

हिंदुस्थानी हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी 27 जून 2025 साठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात उद्या अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑरेंज अलर्टमुळे स्थानिक प्रशासनाला पूरपरिस्थिती, पाणी साचणे आणि भूस्खलन यांसारख्या संभाव्य धोक्यांबाबत तयारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगडमधील नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, नदी, नाले आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांना रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असा सल्ला देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;