तुमच्याही बाथरुममधून वारंवार गोम येते का? मग हे उपाय नक्की करुन बघा

तुमच्याही बाथरुममधून वारंवार गोम येते का? मग हे उपाय नक्की करुन बघा

आपल्या घरातील बाथरुममधून अनेक किटक किंवा सरपटणारे प्राणी येत असतात. यामध्ये झुरळ, पाली तसेच गोम यांचा समावेश असतो. घरामध्ये गोम दिसल्यावर, तिला अनेकदा मारुन टाकले जाते. परंतु ही गोम घरात येऊ नये म्हणून आपण उपाय करणे गरजेचे आहे. खासकरुन पावसाळ्यामध्ये अनेक घरातील बाथरुममधून किंवा बेसिनच्या सिंकमधून गोम येते. अशावेळी दुर्लक्ष करण्यापेक्षा यावर प्रभावी उपाय शोधणे हे गरजेचे आहे.

गोम कानात गेल्यावर किंवा चावल्यास वेदना खूप होतात. त्यामुळेच घरातील काही कानाकोपऱ्यांमध्ये आपले लक्ष असायलाच हवे. घर गोममुक्त करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवणे हे गरजेचे आहे. जसे की, दररोज बेसिनचे सिंक चांगले स्वच्छ करायला हवे. तसेच स्वयंपाकघरातील कचरा वेळेवर बाहेर फेकून द्यायला हवा. दर आठवड्याला ड्रेन पाईपमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घाला. यामुळे घाण आणि कीटक येण्यापासून बचाव होतो.

Kitchen Cleaning Tips – किचनमध्ये पालींची संख्या वाढलीय, काळजी करु नका! हे 3 प्रकारचे स्प्रे पालींवर पडतील भारी

कडुलिंबाचे तेल आणि कापूर
कडुलिंबाच्या तेलात कापूर मिसळा आणि त्याचा स्प्रे तयार करा. स्वयंपाकघर, बाथरूम आणि बेसिनजवळ हा स्प्रे रात्री मारावा. कडुलिंबाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हा वास किटक तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना आवडत नाही. त्यामुळे असे किटक या वासापासून दूर राहतात.

तमालपत्र आणि लवंग
बेसिन, बाथरुम तसेच इतर ओलसर ठिकाणी तमालपत्र आणि लवंगेचा वापर करावा. या वासामुळे गोम दूर राहण्यास मदत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;